कोणताही खेळ म्हणजे फक्त हरणे-जिंकणे इतकाच मर्यादित नसतो, खेळातून संघभावना, व्यक्तिमत्व विकास आणि खिलाडूवृत्ती यांचा विकास होतो. त्यामुळे फक्त हरणे-जिंकणे या बाबी बाजूला ठेऊन खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा. तसेच प्रत्येक खेळात यशस्वी होण्यासाठी त्या खेळाविषयी पॅशन असणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी केले.
या दिग्गज क्रिकेटपटूने एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिकेट संघासोबत क्रिकेटची एक फेरी खेळली, शॉट्स मारले आणि स्पर्धात्मक भावनेने विद्यार्थ्यांना आनंद दिला. आपल्या स्पष्ट बोलण्यात इरफानने क्रीडा महोत्सवासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशीही संवाद साधला.एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या ‘एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0’ या वार्षिक क्रीडा कार्यक्रमात सर्व वयोगटातील अनेक क्रीडा रसिकांची भेट घेतली. 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवात हजारो स्पर्धकांनी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, तिरंदाजी, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, खो-खो, टग ऑफ वॉर आणि लांब उडी यांसारख्या क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेतला आणि स्पर्धा केली. आयोजित खेळांचे बक्षीस वितरण इरफान पठाण यांच्या हस्ते करण्यात आल
इव्हेंटमध्ये बोलताना डॉ अमृता वोहरा – डायरेक्टर प्रिन्सिपल, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, म्हणाल्या, “हा स्पोर्ट्स फेस्टिवल आमच्या शाळेतील सर्वात मोठा वार्षिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी इरफान पठाण सारख्या दिग्गज खेळाडूने भेट दिली यासाठी आम्ही आनंदी आहोत. लॉकडाऊन नंतरच्या काळात खेळताना विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणात होता. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्हाला सर्व सहभागी आणि विजेत्यांचा अभिमान वाटतो ज्यांनी या स्पर्धात्मक क्रीडा महोत्सवात आपला वेळ, ऊर्जा आणि कौशल्य समर्पित केले आहे. एल्प्रो स्पोर्ट्स फेस्ट 2.0 ला उत्तुंग यश मिळवून देणाऱ्या प्रत्येक सहभागीच्या भावनेचे मी कौतुक करते.