पिंपळे गुरव : १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील प्रभाग क्र. ४१ चे धडाडीचे भावी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.


लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असे म्हंटले जाते. १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शामभाऊ जगताप यांनी पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात स्थानिक पत्रकार यांना आमंत्रित करून यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी राजश्री पवार, शुभांगी जाधव, एकता जाधव, संगीता पाचंगे, अशोक जमाले, प्रकाश जमाले, सागर झगडे, संतोष महामुनी, मिलिंद संधान, बलभीम भोसले, महादेव मासाळ, संदीप सोनार, विजय गायकवाड, रमेश मोरे आदी पत्रकारांचा सन्मान शाम भाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो. १६ नोव्हेंबर ‘राष्ट्रीय पत्रकार दिवस’ हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या जबाबदाऱ्यांचे महत्व असते. उपस्थित सर्व पत्रकार सातत्याने पिंपरी चिंचवड परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या आदी वर्तमान पत्र, मीडिया, पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करीत असतात. त्यामुळे दररोज शहर परिसरात घडणाऱ्या घडामोडी आम्हांस वाचावयास मिळत असतात.
शामभाऊ जगताप, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं. चिं. शहर

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »