पुणे : डासांच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारे आजार रोखण्यासाठी, हाऊस आॅफ डाबरतर्फे निर्मित भारतातील सर्वात लोकप्रिय माॅस्किटो-रिपेलन्ट उत्पादन ‘ओडोमाॅस’ तर्फे आज पुण्यात डेंगीमुक्त भारत (#MakingIndiaDengueFree) या मोहिमेचा प्रारंभ झाला.
या उपक्रमांतर्गत ओडोमाॅस सुमारे २० लाख नागरिकांपर्यंत थेट पोचणार असून त्या नागरिकांना डेंगी व मलेरियाच्या घातक परिणामांची माहिती देऊन, या आजारांपासून आपला बचाव कसा करायचा याबाबत जनजागृती करणार आहे. तसेच, ओडोमाॅस माॅस्किटो रिपेलन्ट क्रिमचे मोफत वाटपही करण्यात येणार आहे.
मोहिमेंतर्गत डाबर ओडोमाॅसकडून बस थांबे, रेल्वे स्थानके आणि शाळांमध्ये डेंगीपासून बचावाबद्दल जनजागृतीपर माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ पुण्यात सुरु झाला असून त्यानंतर महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेश येथील सुमारे ७० शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमा अंतर्गत आज खडकी येथील स. वि. स . शाळेत विद्याथ्यांना डॉक्टर सतीश पाथरकर यांनी ,मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मगर, राजेंद्र राममूर्ती आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
डाबर इंडिया लिमिटेडच्या ब्रँड मॅनेजर साक्षी प्रसाद म्हणाल्या, “डेंगीसह डासांपासून होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांची मदत करण्यासाठी, ब्रँड म्हणून ओडोमाॅसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डेंगीची रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अशा आजारांचा प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून, डेंगीपासून बचावासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. डेंगीचा प्रसार होऊ नये यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करता येईल तसेच सामाजिक पातळीवर आपण कशाप्रकारे शिस्त पाळली पाहिजे याबाबत जनजागृती करण्याची आज गरज आहे. मोहिमेंतर्गत डेंगी व मलेरियाच्या आजारांची माहिती व त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल आम्ही नागरिकांमध्ये जागृती करत आहोत.”
डाबर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ मार्केटिंग व्यवस्थापक (होम केअर) संतोष जयस्वाल म्हणाले, “डेंगी व मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय योजनाच प्रभावी ठरतात. त्यामुळे ‘डेंगीमुक्त भारत’ या आमच्या मोहिमेंतर्गत डासांच्या प्रादुर्भावामुळे पसरणाऱ्या आजारांविषयी आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबाबत आम्ही जनजागृती निर्माण करीत आहोत. आपला स्वतःचा बचाव करण्यासह आपल्याला लहान मुलांच्या संरक्षणाचाही विचार करणे गरजेचे आहे. मोकळ्या ठिकाणी खेळतानाच नव्हे तर घराच्या खोलीमध्येही डेंगी, मलेरियापासून त्यांचा बचाव करता आला पाहिजे. जीवघेण्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांपासून संपूर्ण बचाव करणारे ओडोमाॅस हे देशातील सर्वात लोकप्रिय असे उत्पादन आहे. दिवस असो कि रात्र, घराबाहेर असो किंवा घरात, डासांपासून संरक्षणासाठी ओडोमाॅस वापरण्याचा सल्ला आम्ही नेहमीच देतो.”
डाबर इंडिया लिमिटेड कंपनीविषयी: डाबर इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. १३९ वर्षांच्या गुणवत्ता आणि अनुभवाच्या वारशावर उभारलेले, डाबर हे आज भारतातील सर्वात विश्वासार्ह नाव आणि जगातील सर्वात मोठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आरोग्य सेवा कंपनी आहे. डाबर इंडियाच्या एफएमसीजी पोर्टफोलिओमध्ये नऊ पॉवर ब्रँडचा समावेश आहे: डाबर चवनप्राश, डाबर हनी, डाबर होनिटस, डाबर लाल तेल आणि डाबर पुदिन हारा हे हेल्थकेअर श्रेणीतील; पर्सनल केअर स्पेसमध्ये डाबर आमला, वाटिका आणि डाबर रेड पेस्ट; आणि अन्न आणि पेय श्रेणीतील रिअल.