यूपीचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचे आवाहनः जागतिक इटरफेथ हार्मनी कॉन्फरन्स २०२२ चे उद्घाटन

पुणे : “वैश्विक शांतता प्रस्थापितेसाठी सर्व धर्म गुरूंनी जागतिक व्यासपीठावर एकत्रित यावे. जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकत्र येतात तेव्हाच शांती स्थापित होऊ शकते. सर्व धार्मिक गुरूंनी त्यांच्या अनुयायांना मानवतेचे पालन करणे आणि इतर धर्मांचा आदर करण्यास प्रेरित करावे.” असे आवाहन उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट,डिझाइन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटामध्ये म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जगद्गुरू-तुकाराम विश्व शांती सभागृह, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित ‘जागतिक इंटरफेथ हार्मनी कॉन्फरन्स २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॉर्मन पंथाचे संस्थापक व विचारवंत जोसेफ स्मिथ ज्यू. यांच्या पुतळ्याचे अनवारण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या प्रसंगी आध्यात्मिक गुरू एल्डर डी.टॉड क्रिस्टोफरसन, युएसए येथील स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजीनियरिंग या उद्योग समूहाचे अध्यक्ष किंग हुसेन, ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष कविंन वर्धीन, रिचर्ड नेल्सन, रोनाल्ड गुणेल, डॉ. अशोक जोशी, लडाख येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचे संस्थापक व्हेनेरेबल भिक्कू संघ सेना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बहाई अ‍ॅकॅडमीचे डॉ. लेसन आझादी हे सन्माननीय अतिथी होते.
अध्यक्ष स्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड उपस्थित होते.


तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, रॉन ब्रुनेल, रिचर्ड नेल्सन व डॉ. प्रियंकर उपाध्याय आणि अमेरिकेतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सतीश महाना म्हणाले,“ सृष्टीवरील प्रत्येकाला शांतीची गरज आहे. आपल्या धर्माबद्दल जसे चांगले बोलले जाते तसेच इतरांच्या धर्माबद्दल वाईट बोलू नये. धर्म याचा अर्थ केवळ धर्म नाही तर त्यात मानवता आणि आपली कर्तव्य देखील समाविष्ट आहेत. सृष्टीवरील सर्व आध्यात्मिक आणि धर्म गुरूंनी एकत्र येऊन मानव कल्याण  व विश्वशांतीसाठी कार्य करावे.”


टी.टॉड क्रिस्टोफरसन म्हणाले, “जासेफ स्मिथला देव म्हणून पूजत नाही तर आम्ही त्यांचा आदार करतो. त्याच्या आध्यात्मिक शक्तीने त्यांना दयाळू आणि सहनशील बनवले. त्यामुळे त्यांना गरीब आणि दलितांबद्दल सहानुभूती वाटली. आज या जागतिक शांतता घुमटात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. ”


किंग हुसेन म्हणाले,“ एमआयटी ज्या पद्धतीने कार्य करीत आहे ते संपूर्ण मानवजातीसाठी आहे. ईश्वरापासून प्रेरणा घेऊन डॉ. कराड हे शांतता आणि सुसंवादासाठी कार्य करतात. महात्मा गांधीनी दाखविलेल्या मार्गावर ते चालत आहेत.”


डेव्हिड हंट्समन म्हणाले,“ जोसेफ स्मिथ हे प्रेमाचे प्रवर्तक आणि सत्याचे पुनरूत्थान करणारे होते. त्यांनी सर्वांसाठी आशा, विश्वास आणि दान याबद्दल विचार मांडले. गरीब आणि गरजूंची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे दूरदृष्टी असलेले डॉ. कराड यांच्या कडे काम करण्याची प्रचंड शक्ती आहे.”


केविन वर्थन म्हणाले, “जोसेफ  स्मिथ यांनी शिक्षणाला खूप महत्व दिले. ज्ञान हे शाश्वत साधन आहे . शिक्षण हे केवळ धर्मशास्त्रापुरते मार्यादित  नाही. अभ्यास आणि विश्वास एकमेकांना मजबूत करतात. आपले चारित्र्य देवासारखे होण्यासाठी ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षण हे सर्वागिण विकासाचे साधन आहे. ज्ञान ही सर्वात मोठी ताकत आहे. ”


प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणले,“ऋषी व संत हे आत्मा आणि मनाचा विचार करतात. अध्यात्म म्हणजे अंधश्रध्दा आहे हा एक गैरसमज आहे. सर्व धर्म हे मानव कल्याणासाठी समान शब्दांचा वापर करतात. आजच्या काळात सार्वभौमिक मूल्यांवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“स्वामी विवेकानंदाच्या तत्वानुसार विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून स्थापित या विद्यापीठाच्या डोम मध्ये सर्व धर्मगुरूंचे पुतळे उभारूण शांतीचा संदेश दिला जात आहे. येथे पीस पाठ्यक्रम सुरू करून मानव जीवनाला सुख व शांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य सुरू केले आहे. स्मिथ यांचा उभारण्यात आलेल्या पुतळ्या बरोबर त्यांचे विचार जीवनात उतरावे. जगात मानवतेचा संदेश देण्यासाठी असे कार्य होणे गरजेचे आहे.”


यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांनी घोषणा केली की, लेह लद्दाख येथे एक आठवड्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


प्रा.डॉ.प्रियंकर उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.  

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »