एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणेचा ४था दीक्षांत समारंभ, ४५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान.

पुणे : विकासाठी आणि गुणवत्तापुरक शिक्षण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्वाचे ठरत असते. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह समाजातील विविध समस्यांचे निराकरण, संशोधनातून विकास घडविता येईल. उच्च गुणवत्तापूर्ण संशोधनात्मक शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळावे. ज्ञानाची उत्पत्ती आणि संशोधनाचे वातावरण निर्मितीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 गेम चेंजर ठरेल ,असे मत भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवारी विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या 4576 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग बोलत होते. यावेळी इस्त्रोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन हे सन्माननीय अथिती म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरु डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरु डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरु प्रा. तपन पांडा, डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि परिक्षा नियंत्रक प्रा. गणेश पोकळे आदी उपस्थित होते.

या दीक्षांत समारंभरात बीटेक मधील केवल पद्मवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल व बॅचलर ऑफ एज्युकेशनचे मिनू कलिता यांचा एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडलने गौरव करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, रौप्य आणि कास्य पदक देण्यात आले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन (यूजी व पीजी), लिबरल ऑर्टस, बीएड, फाइन ऑर्टस, मिडिया अ‍ॅण्ड पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान,फॉर्मसी, सस्टेनेबल स्टडीज, डिझाइन, गर्व्हनन्स इ. शाखेत मिळून एकूण ४५७६ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.


शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनातील धैय साध्य करण्यासाठीचा हा दिवस महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या काळानुसार शिक्षण दयावे. शिक्षणातून विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत आध्यात्माची सांगड घालता यावी. प्राचिन भारतीय शिक्षण पद्धतीत संशोधनाला विशेष महत्व होते. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाच्या माध्यातून प्रॉक्टिक्ल ज्ञान देण्याचे कार्य झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्यामाध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीला उच्च पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य होईल. बहुशाखांच्या अभ्यासक्रमातून होलिस्टिक डेव्हल्पमेंट आणि संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याचे साधन हे धोरण ठरेल. स्किल शिक्षण प्राथमिकपासून देण्याचा नीर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल युगात हे शिक्षण धोरण डिजिटल शिक्षणाचे वातावरण तयार करेल.

पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, समाजाच्या विकासासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण प्रदान करण्याचे कार्य एमआयटीच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःचे करिअर घडविण्यासाठी ते बाहेर पडतील. यशस्वी होण्यासाठी आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी एमआयटीतील शिक्षण मदत करेल. भारत हा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, संशोधनात्मक वृत्ती जोपासणारा देश आहे. भारतीय मुल्यात्मक शिक्षण हेच ध्येय साध्य करण्याचे साधन आहे. होलिस्टिक डेव्हल्पमेंटसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण बनविण्यात आले आहे. विद्यापीठ हे देशाच्या विकासाची पायाभरणी करणारे स्थान आहे. तंत्रज्ञानासोबतच आध्यात्मिक वातावरण येथे असावे. भारतीय स्पेस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील काही वर्षात भारतीय स्पेसमध्ये जाऊ शकतो, हे केवळ भारतीय युवकांमुळे घडू शकते. भारतामध्य़े मोठ्या प्रमाणात संधी वाट पाहत आहेत.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मुल्यात्मक शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. पालकांना आपेक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ ज्ञानाचे दालन म्हणून उदयाला येईल. सुख-समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताचे आहे. शिस्त आणि चारित्र्य हे खरे शिक्षण आहे . हे शिकविण्याचे कार्य येथून शिक्षणाच्या द्वारे केले जात आहे. विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालून शिक्षण प्रदान करण्याचे कार्य व्हावे. मूल्याधिष्टित शिक्षणपद्धतीनेच विद्यार्थ्यांचा सर्वगुण संपन्न असा नागरिक निर्माण होईल भविष्यात भारतीय संस्कृती जगाला मार्ग दाखवेल

राहुल कराड म्हणाले, भारताला जगात शिखरावर घेऊन जाणारी पिढी घडविण्याचे कार्य विद्यापीठातून होत आहे. रोजगारासोबतच समाजाचा जबाबदार व्यक्तिमत्व घडविण्याची आमची जबाबदारी आहे. विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी समाज आणि देशाच्या कल्याणाचा विचार करावा. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे धैय्य साध्य व्हावे. दरम्यान, पीस स्टटीज्‌ साठी आम्ही अभ्यासक्रम तयार केला आहे. तो राष्ट्रीय शिक्षण धोरणात समावेश करण्याची विनंती ही त्यांनी यावेळी केली. इंडियाचे नावे भारत करण्याची विनंती ही त्यांनी केली. भारतीय विचार जगात पसरविण्याच कार्य विद्यार्थ्यांनी करावे. विद्यापीठाच्यामाध्यातून डॉ. विश्वनाथ कराड स्टार्टअप फंड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यां स्वतः व्यवसाय आणि संशोधनासाठी उपयोग होऊ शकेल. यातून नवीन उद्योजक आणि संशोधक निर्माण होतील.


डॉ. आर.एम. चिटणीस यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गौतम बापट, प्रा. चायनिका बसू व प्रा पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गणेश पोकळे यांनी आभार मानले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »