पुणे : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त 15 ऑक्टोंबर 2022 रोजी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एच.ए) च्या प्रंचड मोठे असणाऱ्या मैदानात ॲड.प्रकाश आंबेडकर यांची विराट धम्म मेळावा होणार आहे .या विराट सभेतून प्रकाश आंबेडकर जनतेशी संवाद साधणार आहेत.त्यांच्या या सभेला पश्चिम महाष्ट्रातून आणि राज्यभरातून लोक मोठ्या संख्येने येणार आहेत .या विराट धम्म मेळाव्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व बौद्ध समाज विकास महासंघ , बानाई आणि इतर संस्था संघटना व बौद्ध वीहारांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे . या विराट सभेला प्रचंड अशी गर्दी होणार आहे .
या विराट धम्म मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर , अंजलीताई प्रकाश आंबेडकर ,बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर रेखाताई ठाकूर ,अशोक सोनाने, राजेंद्र पातोडे ,भिकाजी कांबळे ,एस.के.भंडारे ,अनिल जाधव ,निलेश भाऊ विश्वकर्मा ,अमित भुईगल , प्रियदशी तेलंग ,देवेंद्र तायडे ,दिशा पिंकी शेख ,डॉ.धैर्यशील फुंडकर ,लताताई रोकडे ,शमिभा पाटील ,रोहीनिताई टेकाळे,अनिता सावळे ,चंद्रकांत लोंढे यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .
अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे डी. व्हीं. सुरवसे ,प्रियद्रशी तेलंग यांनी दिली .