
पुणे : भारतातील आघाडीची आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आरोग्य सेवा कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने प्रीमियम ब्लॅक टीच्या बाजारपेठेत डाबर वैदिक चहा दाखल केल्याची घोषणा केली. तीसपेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधी वनस्पतींनी युक्त डाबर वैदिक चहा आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते, हे संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे.
डाबर इंडिया लिमिटेडच्या हेल्थ सप्लिमेंट विभागाचे मार्केटिंग प्रमुख श्री प्रशांत अग्रवाल म्हणाले: “गेल्या वर्षी डाबर वैदिक सुरक्षा चहा टी बॅग स्वरूपात यशस्वीपणे दाखल झाल्यानंतर, नवीन उत्पादन डाबर वैदिक चहा बाजारपेठेत दाखल करताना आम्हाला आनंद होतो आहे. या चहाला मिळणाऱ्या प्रतिसादासाठी आम्ही उत्सुक आहोत. देशभरातील चहाप्रेमींसाठी ब्लॅक टी पर्याय झाला असताना वैदिक चहामध्ये आसाम, निलगिरी आणि दार्जिलिंगमधील प्रीमियम चहाच्या पानांचे विशेष मिश्रण असल्याने हा चहा सर्वोत्तम ठरला आहे. तीसहून अधिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या गुणांनी युक्त चहा चव, सुगंध आणि रंगाचे अप्रतिम मिश्रण ठरला आहे.
डाबर वैदिक चहामध्ये तुळशी, आले, वेलची इत्यादी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा अंश आहे. वास्तविक औषधी वनस्पती चहाच्या पानांसह यात स्पष्टपणे दिसतात. हे परिपूर्ण मिश्रण ‘शरीराला पुन्हा ऊर्जा देते’, ‘तणाव कमी करते आणि ‘प्रतिकारशक्ती वाढवते’, ज्यामुळे ग्राहकांना तीन प्रमुख आरोग्य फायदे मिळतात, असे अग्रवाल म्हणाले.
भारतातील घरगुती ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्टवर उपलब्ध होणारा डाबर वैदिक चहा तीन पॅक मध्ये उपलब्ध असेल: १०० ग्रॅम चहाची किंमत रुपये ६०, २५० ग्रॅम चहाची किंमत रुपये १५० आणि ५०० ग्रॅम चहाची किंमत रुपये २९५ ठेवण्यात आली आहे.

कांचन मिश्रा (वरिष्ठ संचालक, उपभोग्य वस्तू (FMCG), होम अँड जनरल मर्चेंडाईज, फ्लिपकार्ट), म्हणाले: आम्ही फ्लिपकार्टवर, सर्वोत्तम दर्जाची उत्पादने देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीनुसार वस्तूंची पूर्तता करण्यासाठी, आम्ही वाजवी किमतीत उच्च-गुणवत्तेच्या नैसर्गिक उत्पादनांमध्ये आघाडी असलेल्या डाबरशी भागीदारी केली आहे. आमच्या लाखो ग्राहकांसाठी डाबरसोबत आमचा हा आरोग्यदायी प्रवास सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. फ्लिपकार्टवरील वैदिक चहासह डाबरच्या चहाच्या पोर्टफोलिओचा विस्तार आमच्या ग्राहकांचा उत्साह वाढवेल आणि आयुर्वेदाचे संपूर्ण नवीन जग आणि त्याचे फायदे त्यांना खुले होतील.
या प्रसंगी बोलताना, डाबर इंडिया लिमिटेड ई-कॉमर्स आणि मॉडर्न ट्रेडचे बिझनेस हेड श्री. स्मरथ खन्ना म्हणाले: “ई-कॉमर्स हे आमच्यासाठी एक केंद्रित चॅनल आहे. याचा उपयोग ग्राहकांना इनोव्हेशन्सचा आनंद देण्यासाठी होतो. गुणवत्तेच्या आघाडीवर प्रत्येक भारतीयाच्या घरगुती स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक आम्ही सादर केला आहे. डाबर वैदिक चहा, प्रीमियम चहाच्या पानांच्या क्युरेटेड मिश्रणापासून बनलेला आहे. आमच्या सर्वात धोरणात्मक भागीदारांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट सोबत हे उत्पादन जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. डाबर आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपनींनी मूल्यवर्धित चहा श्रेणीतील उदयोन्मुख ट्रेंड समजून घेण्यासाठी जवळून काम केले आहे आणि मला विश्वास आहे की वैदिक चहा आमच्या ग्राहकांना खूप आवडेल.”
डाबर इंडिया लिमिटेड बद्दल:
डाबर इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एफसीजी कंपन्यांपैकी एक आहे. १३८ वर्षांच्या गुणवत्ता आणि अनुभवाच्या आधारावर उभारलेले, डाबर हे आज भारतातील सर्वात विश्वसनीय नाव आणि जगातील सर्वात मोठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आरोग्य सेवा कंपनी आहे. डाबर इंडियाच्या एफसीजी पोर्टफोलिओमध्ये नऊ पॉवर ब्रँडचा समावेश आहे. डाबर च्यवनप्राश, डाबर हनी, डाबर होनिटस, डाबर लाल टेल आणि डाबर पुदिन हारा हे हेल्थकेअर श्रेणीतील तसेच पर्सनल केअर स्पेसमध्ये डाबर आमला, वाटिका आणि डाबर रेड पेस्ट ही कंपनीची ओळख आहे.