पुणे : लाल महल मध्ये वैष्णवी पाटील, कुलदीप बापट या दोघांनी मिळून एका लावणी चा व्हिडिओ शूट केला आहे.
जसजसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याचाही या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले. आणि राष्ट्रवादी पक्षाने तर यासाठी जोरदार आंदोलन करून या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे
संपूर्ण घटना काय ?
चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटीलने लावणी नृत्य करून लाल महालाच्या प्रतिमेची विटंबना केली होती.
अखिल मराठा महासंघाच् आंदोलन
अखिल मराठा महासंघाच्या वतीने आज लाल महल शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले. जिजामाता च्या मूर्तींला अभिषेक करण्यात आला. लालमहालाच्या संपूर्ण परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण आंदोलन पार पडले.
शिवसेनेचे आंदोलन
जोरदार घोषणाबाजी करून शिवसेनेचे कार्यकर्ते लाल महाल बाहेर आंदोलन करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन
पवित्र वास्तुमध्ये जिजाऊ माँ साहेबांनी बालशिवबांना संस्काराचे धडे दिले,ज्या लालमहालात मिळालेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या लाल महालात अशलाघ्य लावणीचे चित्रीकरण करणाऱ्या कुलदीप बापट, वैष्णवी पाटील,केदार अवसरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.तसेच त्यांना परवानगी देणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहीजे,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाल महाल चौक येथे आंदोलन घेण्यात आले.
लाल महल मध्ये वैष्णवी पाटील, कुलदीप बापट या दोघांनी लावणी सादर केल्या नंतर जाहीर माफी मागितली