
पुणे : आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर आपली त्या कामावर निष्ठा आणि जिद्द आवश्यक आहे .जगात अशक्य असे काही नसते .सर्व काही आपण करू शकतो फक्त आपल्याकडे सकारात्मकता हवी ती आपल्याला नवी ऊर्जा निर्माण करते व त्यातूनच आपण हवे त्या क्षेत्रात ध्येय साध्य करू शकतो असे मत सुप्रसिध्द अभिनेत्री व उत्कृष्ठ तायकांदो खेळाडू नीतू चंद्रा यांनी व्यक्त केले. फिक्की फ्लो महीला आघाडी आयोजित अभिनय व आरोग्य विषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू चंद्रा यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले .

पुढे त्या म्हणाल्या की, माझे बालपण हे अतिशय हलाखीच्या आणि बिकट परिस्थीत गेले .खूप बिकट परिस्थितीतून मी आले आहे .मला संघर्ष करणे खूप सवयीचे झाले आहे .
सुरुवातीला मी खेळाडू होण्याचे स्वप्न पाहिले आणि चार वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तायकांदो मध्ये भारताचे प्रतिनिधितत्व केले आहे .परंतु मला चित्रपट क्षेत्रातून चालून संधी आल्याने मी या क्षेत्रात आले .आणि येथेही यशस्वी होत आहे .याचे कारण म्हणजे जिद्द ,चिकाटी आणि सकारात्मक दृष्टी होय .आपण ही कायम सकारात्मक दृष्टी ठेवावी असे आव्हान नीतू चंद्रा यांनी केले .
या कार्यशाळेचे आयोजन फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम शेवलेकर यांनी केले होते .नीतू चंद्रा यांचे स्वागत फिक्की महिला आघाडी उपाध्यक्षा उद्योजिका रेखा मगर यांनी केले .
यावेळी फिक्की महिला विंगच्या अध्यक्षा वरिष्ठ उपाध्यक्षा रेखा मगर, उपाध्यक्ष पिंकी राजपाल ,खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम खोच्चर, सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनीस, उषा पूनावाला यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.