पुणेb: करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या खर्‍या कोविड योद्ध्यांना हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचे उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यातर्फे मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. विश्रामबाग, फरासखाना, खडक, स्वारगेट, समर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांच्या हस्ते सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले.

पोलिस हादेखील माणूसच आहे, अशी भूमिका हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेबांची होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अनेक सेवाभावी स्वरुपाचे उपक्रम शिवसेनेच्यावतीने नेहमी घेतले जात असतात. शूर आणि धाडसी पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार नेहमी करत आलो आहोत. कोरोनाच्या या तिसर्‍या लाटेत अधिकाधिक पोलीस बांधव संक्रमित होत असल्याचे चित्र पहायला मिळत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम शिवसेनेच्या वतीने घेत असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

कोरोना काळात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून नागरिकांच्या रक्षणासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावले. अशा कोरूना योद्ध्यांचा फुल ना फुलाची पाकळी देऊन सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख व महात्मा फुले मंडई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभाग संघटक नंदू येवले, विभागप्रमुख नितीन परदेशी, कामगार सेनेचे अनंत घरत, संतोष भूतकर, नागेश खडके, राजेश मोरे, युवासेनेचे सनी गवते, युवराज पारीख, मनीषा धारणे, निलेश जगताप, हर्षद मालुसरे, गणी पठाण, दिनेश दाभोलकर उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »