पिंपरी : श्री सदगुरु बाळूमामा यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा घेवून समाजातील गोरगरीब, अनाथ व गरजू लोकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रीसदगुरु बाळूमामा संस्थेच्या दिनदर्शिकेचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडूशेठ मारकड पाटील, काकासाहेब मारकड, सभापती गणेश शिंदे, राष्ट्रवादीचे इंदापुर तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात, डॉ. बाळासाहेब सोनवणे, धनराज गरड, प्रसाद पाटील, सचिन सलगर, तानाजी कोपनर, बिरमल मारकड, दिनेश गडदे, राहुल चव्हाण, प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, की या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, धार्मीक, व सामाजीक क्षेत्रात विविध विधायक उपक्रम राबवून पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे.


संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवून अनाथ, गोरगरीब अनाथ जनतेच्या हितासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी संस्था वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी दिली. तसेच संस्थेच्या वतीने पाच हजार दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, संस्थेच्या वतीने दत्तात्रय भरणे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ, घोंगडी देवून सत्कार करण्यात आला.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »