नवी सांगवी : शिक्षणाचा प्रसार करणे, सामाजिक क्षेत्रात काम करून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे त्या कठीण काळात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी ओळखले. त्यामुळेच शिक्षणाच्या जोरावर आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. यावरून समजते की फुले दाम्पत्याचे महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले.


पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि लुंबिनी महिला संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मराठवाडा जनविकास संघातर्फे लुंबिनी महिला संघातील महिलांचा गुणगौरवही करण्यात आला. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, लुंबिनी महिला संघातील अनुसूया कांबळे, नीता गजभिये, शोभा यादव, अरुणा जाधव, शालिनी जाधव, वनिता भिंगारे, सविता भालेराव, अंजू मेंढे, मनीषा साळवे, निशा कुरणे, शुभांगी ठोंबरे, उषा माने, किरण ढाले, वैशाली धुमाळ आदी उपस्थित होते.


अरुण पवार पुढे बोलताना म्हणाले, की १८व्या शतकात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी मोठे कार्य केले. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या केवळ फुले दाम्पत्याच्या दूरदृष्टीमुळे. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीतून महिलांना बाहेर काढून शिक्षण दिल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरत आहेत, ही अमूल्य गोष्ट आहे.


लुंबिनी महिला संघातील कल्पना कांबळे यांनी विविध वैचारिक व प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाईंना अभिवादन केले. त्या म्हणाल्या, आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंच्या त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीबाईंचे प्रगतशील विचार व समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. फुले दाम्पत्यांनी जुन्या चालीरिती व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले. समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »