पुणे : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी रक्ताचे दान दिले, स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आपणही देशवासीयांसाठी रक्तदान करूया’ या विचाराने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पूना ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन, पंजाबी कल्चरल असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ पूना पिंपरी-चिंचवड, पुणे शताब्दी, पुणे स्पेक्ट्रम आणि प्रिय प्रकाशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सॅलसबरी पार्कमधील पंजाबी कल्चरल असोसिएशन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, महासंघाचे सेक्रेटरी महेंद्र पितालिया यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. रांका यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे संयोजन प्रिय प्रकाशनच्या मनीषा फाटे यांनी केले यावेळी 58 पिशव्या रक्त संकलन झाले.

सौ. फाटे यांनी कोरोना काळात ४० हून अधिक अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा मिळवून दिला, तसेच मानसिक दृष्ट्या खचलेल्या रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. रक्तदान शिबिरासाठी विविध संस्थांना मदत करून अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी त्या प्रवृत्त करतात.

या कार्यक्रमाला पंजाबी कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष कश्मीर नागपाल, पूना ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वीरमितसिंग मैनी, पंजाबी कल्चरल असोसिएशनचे ट्रस्टी कैलाश मलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »