स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा पुणे ग्रामीण यांनी 24 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पुणे : शिरूर पोलीस स्टेशन गु.र नं.605/2021 भा. द.वी. कलम 302, 201 हा दिनांक 17/08/2021 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी अंजली कानिफनाथ पांढरकर वय 35 वर्षे राहणार खंडाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली की त्यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर वय 40 वर्षे हे दिनांक 15/08/2021 रोजी सकाळी दहा वाजता चे सुमारास फिर्यादीस शेतात सोडून त्यांच्याकडील मोटारसायकल घेऊन त्यांचा वाढदिवस असल्याने तेथून निघून गेले.
त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क केला परंतु फोन बंद लागला त्यानंतर दिनांक 16/08/2021 रोजी खंडाळे गावचे पोलीस पाटील यांचेकडून फिर्यादी यांना त्यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पंढरकर हे न्हावरा - तळेगाव रोडलगत घाटाजवळ जखमी अवस्थेत पडलेले असले बाबत माहिती मिळाल्याने फिर्यादी यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता फिर्यादीचे पती यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून त्यांना जीवे ठार मारून त्यांचे डोक्यावर व चेहर्यावर दगड मारून चेहरा विद्रूप करून त्यांची ओळख पटू नये याकरता पुरावा नष्ट केला वगैरे मजकूर ची फिर्याद शिरूर पोस्टे येथे दिली आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक डाॅ. श्री.अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. यांना सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे उद्देशाने सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते साो., दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस साो. यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. यांनी सपोनि. सचिन काळे, सहा. फौजदार तुषार पंदारे, पोहवा. जनार्दन शेळके, पो.हवा. राजु मोमीण, पो.हवा. अजित भुजबळ, पो.ना. मंगेश थिगळे, चा.पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्यावरून सदरचा गुन्हा हा दादाभाऊ मारुती वाघ वय-26 वर्षे,राहणार-निमगाव दुडे,तालुका-शिरूर,जिल्हा-पुणे.हल्ली राहणार-हरुण पठाण यांच्या खोलीत ढोकसांगवी तालुका-शिरूर,जिल्हा- पुणे. याने त्याचे नात्यातील एका विधीसंघर्षित बालकाचे मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने व सदर आरोपी हा ढोक सांगवी येथे एका बिल्डिंगमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि येळे, पोसई मुंडे व स्टाफ चे मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून सदरचा गुन्हा हा दादाभाऊ मारुती वाघ याने त्याचे नात्यातील विधी संघर्षित बालक याचे मदतीने दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे कबूल केले आहे.
सदर आरोपीवर यापूर्वी
लोणीकंद पो.स्टे गुरनं 452/16भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
*सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साो. सपोनि सचिन काळे सहा.फौज. तुषार पंधारे पोहवा जनार्दन शेळके पोहवा राजू मोमीन पोहवा अजित भुजबळ पोना मंगेश थिगळे चापोहवा मुकेश कदम व रांजणगाव पो.स्टे चे सपोनि येळे ,पोसई मुंढे यांनी केली आहे