राजश्री अतकरे पवार

पुणे: भाजप नगरसेवक रवि लांडगे यांच्या वाढदिवस शुभेच्छा होर्डिंग्जवर भाजप एवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे छाय़ाचित्र झळकल्याने पिंपरी-चिंचवड मध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. २०१७ मध्ये रवि लांडगे भाजपकडून बिनविरोध निवडून आले होते. 15 –ला रवी लांडगे त्यांच्या शुभेच्छा होर्डिंग्जवरून भाजपचे नेते गायब झाल्याने त्यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे भाजपमध्ये खळबळ आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या किल्ल्यास खिंडार पडण्याची भीती आहे. भोसरी मतदारसंघातून लांडगे भाजपकडून बिनविरोध नगरसेवक झाले. लांडगे यांचा वाढदिवस 15 – रोजी होता. त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांना शहरभर शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावले आहेत. परंतु त्यावर लांगडे यांच्या सोबत भाजपएवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या, पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र झळकले आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, पार्थ पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही छायाचित्रे होर्डिंग्जवर आहेत.

त्यामुळे भाजपला धक्का देत लांगडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. लांडगे व त्यांचे समर्थक यावर प्रतिक्रिया देत नसल्याने चर्चेचे गूढ अजूनच वाढले. लांडगे यांनी अद्याप पक्षांतरास दुजोरा दिला नसला तरी होर्डिंग्जमधून त्यांचे समर्थक व भाजपचे स्थानिक नेते अर्थ काढू लागले आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून लांडगे व त्यांचे कुटुंब भाजपचेखंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.


सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रूजवण्याचे श्रेय रवि लांडगे यांचे काका अंकुशराव लांडगे यांना दिले जाते. रवि लांडगे यांचे वडील बाबासाहेब १९८६ ते १९९२ दरम्यान भाजपकडून महानगरपालिकेत नगरसेवक झाले. पुढे १९९७ मध्ये रवि लांडगे यांचे काका अंकुशराव लांडगेदेखील नगरसेवक बनले.

याच काळात भाजपचा शहरात विस्तार झाला. अंकुश लांडगे यांच्या निधनानंतर पत्नी आशा यांनीदेखील बिनविरोध नगरसेवकपद मिळवले. तर २०१७ साली स्वतः रवि लांडगे भाजपकडून बिनविरोध नगरसेवक बनले. स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे पक्षाचे आश्वासन मात्र हवेत विरले. तत्कालिन आमदार महेश लांडगे यांनी रवि यांना अध्यक्षपदावरून डावलले. तेव्हापासूनच रवि लांगडे दुखावल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. त्यांनी या बाबत पत्रकार परिषद घेऊन नाराजी देखील व्यक्त केली होती. डावल्यामुळे रवि लांडगे यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देखील महापौर माई ढोरे यांच्याकडे दिला होता.

गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या नाराजी नाट्याची परिणिती होर्डिंग्जवरून भाजप नेत्यांचे छायाचित्र गायब होण्यात झाल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भोसरीचे भाजपचे दुसरे नगरसेवक संजय नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उपस्थित होते. रवि लांडगे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. याच व्यास पिठावर नाराज भाजप नगरसेविकेचे पतीदेखील उपस्थित होते. त्याचाही संदर्भ होर्डिंग्ज राजकारणाला दिला जात आहे.

राष्ट्रवादीत घरवापसी?

मागील महानगरपालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्यांची घरवापसीची चर्चाही सुरू आहे. रवि लांडगे यांचे चुलतबंधू अमित यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रवि लांडगे यांच्या राजकीय खेळीचा अंदाज बांधला जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »