पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने शंभर कोटी जाहीर केले होते. परंतु कोरोना संकटामुळे एकही रुपया आत्तापर्यंत दिला गेलेला नाही. आता कोरोना परिस्थिती सुधारत आहे. आता तरी 100 कोटी जाहीर केलेला निधी देण्यात यावा अशी मागणी R.P.I. मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना हनुमंत साठे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान ल लक्षात घेऊन त्यांनी केलेले समाज प्रबोधन, याचा कायमच मातंग समाजाला अभिमान असतो. यासाठी कोरोना काळात देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व बंधू,भगिनी याठिकाणी येऊन कोरोना चे सर्व नियम पाळून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आहेत.

तसेच महाराष्ट्रातील 117 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. मात्र यावर अद्यापही कुठलाही निर्णय झाला नाही. तसंच चिराग नगर येथील अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक होणार ही घोषणा झाली, मात्र ती अद्यापही कागदावरच आहे. ती प्रत्यक्षात उतरली नाही तर या कामाला आता महाविकास आघाडी मने हातात घेऊन पूर्णत्वास नेले पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.


