पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोणता पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार तसेच पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण 405 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिला तसेच तरुण वर्गांचा खूप मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यावेळी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र, प्रोटीन सप्लिमेंट, ब्लुटुथ इयरफोनचे देखील वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर सांगवीच्या एम. एस. काटे परिसरातील राजयोग हाईटस (हॉटेल सुरुची तळ मजला) येथे पार पडला. कोरोना चे सर्व नियम पाळून नागरिक या शिबिरास उपस्थित होते.
या प्रसंगी जेष्ठ डॉक्टर वसंत खांडगे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर शकुंतला धराडे, जगदीश शेट्टी यांच्या हस्ते पार पडला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेवक नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महेश भागवत माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, करुणा चा महामारी ने सर्वांना रक्ताचे महत्त्व पटवून दिले यासाठी कोरोनाच्या परिस्थीती असतानादेखील रक्तदात्यांनी या शिबिराला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकाचा भाग ठरतो. येणारा काळ अधिक परीक्षा देणार आहे या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते. याची जाण ठेवून राजेंद्र जगताप यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद बघून डोळ्याचे पारणे फिटले त्यामुळे त्यांना कौतुकाची थाप दिली पाहिजे.
या रक्तदान शिबिरासाठी राजेंद्र जगताप प्रतिष्ठानतर्फे साहेबराव तुपे, अभिषेक जगताप, अतुल ससाणे, शैलेश दिवेकर, नितिन कोले,
पंकज मालविया, अर्जुन शिंदे, आनंद दिवेकर, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र कोतवाल, संदीप राठोड आदींनी मान्यवरांनी परिश्रम घेतले.