पुणे : उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. 

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना व्यक्तींना ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच नागरिकांना वृक्ष वाटप  देखील करण्यात आले.  तसेच ई सेवा उपक्रम राबविण्यात आले.  याअंतर्गत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड मोफत काढून देण्यात आले.  तसेच उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट आदी कागदपत्रेही मोफत नागरिकांना काढून दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघिरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल दादा शितोळे, नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अमरसिंग आदीयाल,  तृप्ती ताई जवळकर, माजी नगरसेविका सुषमाताई तनपुरे, उज्वलाताई ढोरे, पुनम ताई  जगताप, अश्विनी ताई जगताप, शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप,  युवा नेते तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, तृप्ती जवळकर, शहर उपाध्यक्षा उज्ज्वला ढोरे, सुषमा तनपुरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित  होते.

याबाबत बोलताना शामभाऊ जगताप युवा मंचाचे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा माजी अध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की आपली सामाजिक जबाबदारी म्हणून अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी विलासतात्या जगताप, जनार्धन जगताप,रोहिदास जगताप, मधुकर रणपिसे, हनुमंत भागुजी  जगताप, अशोक जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप,  किसन जगताप, ज्ञानेश्वर जगताप, संदीप नलावडे, संतोष देवकर, कैलास जगताप, सोमनाथ जगताप, गणेश काशिद, आदेश जगताप, अतुल काशीद, गणेश जगताप,नयन अहिरे, राजु कांबळे  आदी मान्यवर उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »