
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कलाकारांच्या उपासमारीमुळे होणारी परवड लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना सहन झाली नाही. त्यासाठी त्यांनी सर्व राजकारणी, श्रीमंत नागरिकांना कलाकारांना मदतीचे आवाहन केले होते.

या आवाहनानंतर आपल्यालाही समाजाचे काही देणे लागते या जाणिवेतून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री गणेश साहेबराव रास्ते यांनी मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कलाकारांना अन्नदान किट वाटप असा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह संजोग वाघेरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती

लोकनेते आदरणीय तसेच पुण्याचे पालक मंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या 61 वाढदिवसानिमित्त 200 पेक्षा अधिक कलावंतांना भोसरीचे प्रथम मा. आमदार विलास शेठ लांडे पाटीलसह संजोग वाघेरे तसेच आयोजक मा. श्री. गणेशशेठ रास्ते पाटील याच्या हस्ते अन्न धान्यासह किटचे वाटप करण्यात आले. यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या सोहळ्यात उपस्थित नसल्या तरी देखील त्यांनी या सोहळ्यास शुभेच्छा पाठवल्या होत्या.

कोव्हिड 19 च्या काळामध्ये सर्व स्तरावर उपासमारीची वेळ आली आहे. तस पाह्याला गेल तर कलावंतावरही उपासमारीची वेळ आली. कारण त्यांचे पोट त्यांच्या कलेवर भागत. एक कलाकार कलेची आराधना करून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असतो. या महामारी च्या काळात सर्वत्र लॉक डाऊन मुळे कलाकारांना कार्यक्रमच मिळाले नाही. या कलाकारांचे सर्व उत्पन्न कार्यक्रमांवर अवलंबून असते. लॉक डाऊन मुळे तेच नसल्यामुळे त्यांची स्वतःची तर उपासमार होत आहेच, परंतु त्यांची कुटुंब देखील उपाशीच झोपत असल्याचे बघायला मिळत आहे.

कलाकारांना आर्थिक सहाय्य कुठले मिळत नसल्याने शेवटी समाजातील सस्ते यांसारखी अनेक मंडळी त्यांच्या मदतीला धावून आली. त्यातच एक हात मदतीचा म्हणून मा. श्री गणेश साहेबराव सस्ते ( कार्याध्यक्ष .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं. चि. शहर ग्राहक संरक्षण समीती ) यांनी अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे आवचीत्त साधून गरजू कलावंतांना किटचे वाटप केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमाला अरूनराव बो-हाडे मा. नगरसेवक प्रकाश शेठ सोमवंशी, मा. नगरसेवक पिं. चि. हरीभाऊ सस्ते पाटील पंचायत समिती सदस्य नितीन दादा सस्ते पाटील अध्यश नागेश्वर देवस्थान ट्रस्ट उत्तम शेठ आल्हाट आध्यश भोसरी विधानसभा राष्ट्रवादी, कवीता ताई आल्हाट पुणे जिल्हा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सपना ताई घाडगे उप अध्यक्ष महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजकुमार सस्ते पाटील, अशोक ढोकले, आतिश बारणे, रविंद्र आल्हाट, अरूण बो -हाडे राजकुमार सस्ते यांची उपस्थिती होती.