
पुणे : पुर परिस्थिसाठी एन डी आर एफ, आर्मी तसेच नेव्ही शासनाने तयार ठेवली आहे. मुख्यमंत्री येथेच थांबले नाही. तर स्वतः पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड मध्ये दिली लाचारी.
सध्या परिस्थितीचा आढावा घेतला असता कोयना धरणात 24 तासात 12 टीएमसी पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही वाट म्हणजेच या धरणातील उचांक वाढ आहे. 24 तासात 18 टीएमसीपाण्याची उचांक पातळी पाण्याने गाठली आहे. याचा परिणाम असा झाला की कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलवले आहे.

कोयना धरणातून सध्या 10 हजार क्युसेक्स पाणी सोडले आहे. ही वाढ 50 हजार क्युसेक्स पर्यंत पोहोचवली जाणार आहे. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग होऊन आता हे पाणी विसर्ग होणार पाणी महाराष्ट्र बॉडरवरील राजापूर धरणा पर्यंत पोहचल आहे.

