
पुणे : संपूर्ण महाराष्ट्रावरील अतिपावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातील पूर नियंत्रण कक्ष प्रमाणेच आरोग्य व्यवस्था देखील या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे हे पिंपरी – चिंचवड शहरातील स्टरलींग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, तिसरया लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे म्हटले जाते. तरी देखील राज्यात 65 टक्के लहानमुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. हा अहवाल नुकताच आयसीएमआर या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडे सबमिट केला आहे.

महाराष्ट्राची सद्य परिस्थिती बघता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघे देखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊ. की जेणेकरून महाराष्ट्राला जास्त लसी मिळू शकतिल. जेणेकरून भविष्यात महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधा बाबत ठोस निर्णय घेता येतील तसेच सर्व नागरिकांना लस दिल्या जातील.

