पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी कामगार संवाद जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भोसरी चे माजी आमदार विलास लांडे यांची देखील उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कष्टकरी महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने कष्टकरी कामगार संवाद आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सत्कार करून चांगल्या कामगिरीची दखल देखील घेतली.