
परिंचे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून वीर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर मधे 14 दिवस कॉरंटाइन असलेले पेशंट त्यांचा घरी जातांना त्यांचा सन्मान करण्यात आला.
यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस चे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र बाप्पू धुमाळ, वीर देवस्थान चे माजी चेअरमन- बाळासाहेब धुमाळ, डॉ. अजिंक्य भिंताडे, सर्व नर्स, धुमाळ काका, परिंचे गावाचे पुजारी, श्रीपाद गुरव, सामजिक कार्यकर्ते सचिन जाधव उपस्थीत होते. त्यावेळी त्यांना डिस्चार्ज देताना त्यांचे शाल तसेच श्रीफळ देऊन अभिनंदन केले
येथील चहा, नाष्टा, थंड तसेच गरम पाणी, जेवण, रहण्याची सोय खुप छान झाली. आमचे 90 वर्षाचे आजोबा सुखरुप घरी परतत आहेत याचा आनंद खुप होत आहे असे सुयोग वाघोले यांनी सांगितले.