“जमू शकत,..हो जमत,.. जमतच,..पुन्हा नव्याने अस्सल समाधानी आरोग्यदायी जगायला!”
पुणे : “स्वयंपाक घरात तेलाशिवाय स्वयंपाक जमूच शकत नाही असं काही नाही,- तेल संपलेल असतानाही आहे त्या घटकांपासूनही छान चविष्ट आरोग्यदायी जेवण ही बनवता येऊ शकते! तुलनात्मक परिपूर्णतेचा अट्टहास न करता- लवचिक प्रयोगात्मक सर्जनशील कल्पकतेने अनेक सुंदर गोष्टी करता येतात. उदाहरणार्थ- भाकरीचा आकार छोटा केल्यामुळे भाकरीची चव, भाकरीचं सत्त्व बदलत नाही, उलट नीट भाजली जाते व सोप्या पद्धतीने लवकर बनते; मग मोठयाच भाकरीचा अट्टाहास कशासाठी!? आजूबाजूचा कठीण परिस्थितींमुळे नाही आणता आली तेल भाजी विकत, तर उपलब्ध डाळींचया पिठाचं पहील्यांदाच चमचाभर पाण्यातच जिरं- लसून- मोहरीची तडका फोडणी देवून केलेलं शेंगदणा चटणीचं मिक्स भरीत पिठलंही वेगळीच झक्कास पुरक चव देतच की! सोबत जवसाच्या भाजक्या बिया आणि गुळ पुड व आवळ्याचे सरबत, अन् सोबतीला मिक्स चिक्कीचा गोडवा असं पोटभर जेवण ही बनवता येत! सोबतच्या फार चवीनं घासून पुसून संपवलेल्या माणसाचा खुश तृप्तीचा ढेकर आपल्याला आनंद देऊन जातो- आपल्याला ही पोटभर छान जेवून होतं अन् संपूर्ण स्वयंपाक संपल्याच समाधान ते वेगळंच हे कौतुकास्पद वाटत स्वतःलाही!!!

….माणसामध्ये आळसाला, नकोशा विचारांना – कटू आठवणींना व नाही त्या अवास्तव भीतीला झुगारून देण्याची हिम्मत असेल अन् ‘झाले- गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे’ अशा खेळाडू वृत्तीसह स्वीकार भाव ठेवल्याने जीवन सुगत- सुकर होते. भूत काळात होऊन गेलेल्या चुकांबद्दल अतिविचारही न करता, परंतु तत्सम चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून भूत- वर्तमान- भविष्याचा अन् भवतालचाही अतिविचार न करता आहे त्या क्षणाला कृतज्ञ भावाने साजरं करीत सुख सुगंध पेरीत- पसरीत जायचं! छान स्मित- मन मोकळं हसत खेळत जीवन सर्वार्थाने जगत राहायचं. सगळ्या जगाचा भारही केवळ आपल्यावरच असल्यागत धूसमुसळेपणा करायची काही गरज नाही; परंतु झालेल्या चुकांची जाणीव ठेवून विनम्रतेसह तत्पर होत स्वतः जबाबदारी घेत- आपल्यांच्याही अवास्तव टीकेकडे व अपेक्षांकडेही दुर्लक्ष करीत- मात्र योग्य त्या सकस सूचनांना समजून घेत; आतताई- आगतिकता, क्रोध यांना लगाम घालीत शांत राहता आलं पाहिजे. यासाठी छान मन विभोर छंदांची मदत होते, योग- प्राणायाम- संगीत- निसर्ग निरीक्षण- प्रार्थना ध्यान साधना-अशा आरोग्यदायी जीवन उत्सव प्रसन्न प्रकारांची; (अति तार्कीक ताठर जड बुद्धिवादी भूमिका बाजूला ठेवीत) अधून मधून बिनदिक्कत मनसोक्त भरभरून मदत घ्यायची. माणूस म्हणून स्वतःचाही मर्यादांचे भान ठेवत स्वतःलाही माफ करीत स्वतः सकट इतरांचा स्वीकार करीत; डोळसपणे कुणाकडून अपेक्षा ठेवावी अन् कुणाकडून नाही ते ठरवत, नकारात्मकता झुगारून सर्जनशील कल्पक नवनवीन प्रयोगशीलता करण्याची इच्छा व आपला उत्साह योग्य सकारात्मक स्वयं सुचनेनुसार सतत पुन्हा पुन्हा दुणावीत ठेवून, स्वतःच्या solitude लाही मस्त बिंदास छान enjoy करता येवू शकतच व यथाशक्ति सुसंवाद युक्त आपलेपणाने कुटुंबवत्सलपण सहजपणे समंजस सहकार्यातून जगताना स्वतःची एक खास स्पेस ही जपता आली पाहिजे तरच भावनिक आरोग्य निकोप समतोल राहील! तसेच स्वावलंबनसह यथाशक्ती व्यवस्थित पणे काम अधिकाधिक नेमकेपणाने करण्याची आवड अन् आपल्या प्रेमळ माणसांबद्दल कृज्ञतापूर्वक आदरभाव काही जुने तरीही सच्चे मैत्र जीवांचे बंध जपणारे खास मित्र मंडळ सह पुन्हा नव्याने मनभर बोलून योग्य ती योग्य वेळी मदत मागण्याची विधायक भूमिका घेत, नको त्या अवाजवी स्व- विघातक अहंकाराला ही स्वतःला स्वतःसाठी व इतरांसाठी नाकारता यायला हवेच की! काही आपसूक नव्याने जुळू पाहणारे समाज उपयोगी बंध, काही नवे संदर्भ ही पुन्हा नव्याने जीवन समृद्ध करण्यासाठी अधिक कळत जातील! जीवन ही सतत नवनवीन शिकत आनंद साजरा करण्याची पर्वणीच असते!!!


“जीवन सुंदर आहे समृद्ध आहे ते समतोला सह अनुभवत- जगत राहण्यासाठी आपल्या सर्वांसाठी काही महत्वाच्या आरोग्यदायी टिप्स आणि ट्रिक्स:-
*हवा-पाणी-सूर्यप्रकाश- शुद्ध निर्मळ चिखल माती या सगळ्या सगळ्यांचा शरीराशी जाणीवपूर्वक आठवड्यातून महिन्यातून किमान चार पाच वेळेस प्रत्यक्ष संपर्क येईल अशा पद्धतीने अर्धा अर्धा तास हवा स्नान, सूर्यप्रकाश अंघोळ, चिखल माती स्नान, जलस्नान ज्याप्रमाणे आपण करतोच त्याप्रमाणे केल्याने आरोग्याचे अनेक फायदे मिळतात.
*आठवड्यातून शक्य तेव्हा अल्टरनेट थंड- कोमट- गरम असं अंघोळ केल्यामुळे, तसेच आठवड्यातून एकदा, पंधरा दिवसातून दोनदा, महिन्यातून तीन चारदा तरी- सकाळी व रात्री झोपण्याआधी अशी दोन्ही वेळेस एकदा गरम आणि एकदा थंड पाणी अशी आंघोळ करावी.- जमल्यास अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर हळद किंवा चंदन पावडर किंवा कडुलिंबाची पाने कधीतरी तुळशीपत्र तसेच एलोवेरा कोरफडीचा मुठभर गर आवडीच्या आत्तर सुगंधाच्या थेंबासह मिसळल्याने, सौंदर्याचे- आरोग्याचे परस्पर पूरक फायदे मिळतात; यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते तसेच पचन- रक्ताभिसरण सुधारते. शरीराचे वजन, उंची, तापमान समतोल राहते. वातावरणातील प्रदूषित घटकांपासून तसेच संसर्गजन्य सूक्ष्मजीवांची पासून संरक्षण होते.
*आजूबाजूच्या विविध रंगांना, विविध गंध- रसांना तृप्त मुग्धपणे अनुभवाव. ज्यामुळे जीवन सतत सुरस जाणवत- आ कळत राहते. उघड्या डोळ्यांनी हिरव्या पारव्या झाडांकडे, रंगीबेरंगी फुलांना- फुलपाखरांना वेगवेगळ्या पक्षांना, निळ्या- पांढ-या- ढगाळ विशाल आभाळालाही काहीवेळ जाणीवपूर्वक बघत राहिले पाहिजे, टपोर दुधाळ चांदण्या रात्री चंद्र चांदण्याना विशेष खगोलशास्त्रीय घटना घडत नसतानाही बघितले पाहिजे. सकाळ व संध्याकाळ च्या कोवळ्या सूर्य प्रकाश, सूर्य लिंबाला ही पाहिले; न्याहाळले पाहिजे…यामुळे जीवनदृष्टी अधिक सुदृढ अधिक समृद्ध अधिक सुंदर होते. जीवनातलं काव्य अनुभवायला मिळतं. (-माईंडफुलनेस हीलींग मेडिटेशन).
*आवडतील अशा बालकविता निसर्ग कविता, भक्ती- भाव गीते गुणगुणणे, काही नामजप करणे, किंवा काही बहुभाषिक शाब्दिक कसरती करणे; यामुळे ताण तणाव कमी होऊन मनस्वास्थ्य सुधारते, प्रसन्नता- कृतिशीलता व उत्साह वाढतो.
*आठवड्यातून एक ते दोन ते तीन तास एवढा वेळ शक्य तेव्हा जमेल तसे, काही शारीरिक व्यायाम, योगासने, सायकलिंग, उड्या मारणे, सहजसुंदर गणपती बाप्पा नाच करणे, यामुळे शरीर सुदृढ प्रमाणबद्ध होत मनोशारीरिक -भावनिक समतोल साधून संपूर्ण स्वास्थ्य सुधारते.
*शक्य तितके शांत राहून भाषेचा- बोली देहबोली हावभाव यांचा जाणीवपूर्वक सुयोग्य सुसंवाद उपयोग करावा. शाब्दिक भाषेचा असंवेदनशील अतिवापर अनेक वादांचे कारण ठरत असतो. कारण शाब्दीक संवाद हा ऐकणारा- बोलणारा यांच्या समतोल क्षमतेवर अवलंबून असतो. कारण चुकीच्या व अप शब्दांचे घाव काळजावर- मनावर बराच काळ खोल रुतून राहतात म्हणून सकारात्मक शब्द भाषेचं सुसंवाद प्रशिक्षण शिकल्याशिवाय अधिकाधिक शांतच- गप्प- मौन राहण्याला अशा प्रकारा शिवाय दुसरा पर्याय नाही. तरीही खुप राग- चिडचिड होत असताना, मोठ- मोठयाने नाम- जप- मंत्र- श्र्लोक स्तवन केल्याने, काही जोराची- कष्टांची कामे केल्यानेही (कपडे-भांडी धुणे- घर साफ करणे) शरीरातील उर्जा उमाळ्याचा निचरा होतो. घरात भांडणं झाली असल्यास क्षमा- प्रार्थना करत आपल्या प्रियजनांना नेमकेपणासाठी पत्र संवाद साधून नातेसंबंध सुधारणे.
*काही निर्माण छंदाना जाणीवपूर्वक जोपासणे- जसे चित्र काढणे, कविता लिहिणे- ऐकणे, स्वयंपाक घरातल्या उपलब्ध पदार्थांपासून नवीन नवीन पाककला प्रयोग करीत राहणे, यूट्यूब व्हिडिओज बनविणे, घराच्या गच्चीवर- बाल्कणी- छोटेखानी दाराच्या कोपऱ्यात- छोट्या-मोठ्या अंगणात भाजीपाला, फुल- फळझाडांची लागवड करून देखभाल करणे, पाऊस पाण्याचे नियोजन- संवर्धन करणे, आजूबाजूच्या निसर्गाची-माणसांची-लोकांची-वस्तूंची,- वेगवेगळी- कल्पक -फोटोग्राफी करणे, वेगवेगळ्या डिझाइन्स रेखाटने, रांगोळी मेहंदी यांच्या सुंदर नक्षी काढणे- शिकवणे, हात शिलाई तून कापडी कलाकृती घडवणे, विविध आवडीच्या विषयांवरील लेख वाचणे-लिहिणे, टेकडीवर फिरायला जाणे- तिथल्या झाडांची फुलांची माहिती मिळवणे, विविध रोपट्यांची लागवड करणे झाडे लावणे आजूबाजूच्या झाडांना- पक्ष्यांना पाणी देणे, विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करणे- संगीत प्रकारातील वेगवेगळे छंद जोपासणे, आवडीच्या साहित्याचे लिखाण करणे ते प्रकाशित करणे, संबंधित आवडीच्या छंदांचे ग्रुप बनवून नवनवीन कल्पनांचे आदान-प्रदान करून नवीन योजना आखणे, रद्दीतून ग्रंथालय अशा पद्धतीने विविध विषयांवरील पुस्तकांचा पासून सर्वांसाठीचे खुले ग्रंथालय- मोबाईल ग्रंथालय दुर्लक्षित घटकांसाठी ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून देणे, स्विमिंग- योगा- सायकलिंग-डान्स एक्सरसाइज, झुम्बा डान्स, सिंपल इजी ॲडव्हेंचरस फिटनेस स्टंट एक्झरसाइज करणे अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आखणे, आयुर्वेद- निसर्ग उपचार- संगीत चिकित्सा- प्रकाश चिकित्सा- मालिश चिकित्सा- आहार चिकित्सा- अशा पारंपारिक आरोग्य उपचार पद्धती शिकणे- समजून घेणे- शिकवणे- तत्सम सेवा पुरवणे, लहानग्यांच्या फॅशन- स्पोर्ट्स शो घेणे, महिलांसाठी फिटनेस- हेल्थ अवेअरनेस -स्पोर्ट्स कॉन्टेस्ट ऍक्टिव्हिटीज चे आयोजन करणे, वृद्ध लोकांचे टॅलेंट हंट शो आयोजित करणे, स्वतःला अवगत असलेल्या कला कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, नवीन कला नवीन छंद समजून घेऊन शिकणे…. यामुळे आपले मन सर्जनशील कल्पक काम करून आनंदित राहते- प्रसन्न होते.
*आपण घालीत असलेला पोशाख हा शक्य तितका आरामदायी तसेच विविध प्रकारच्या रंग सूत पोत प्रकारांमध्ये आलटून पालटून घातल्याने आपल्याला त्याचे वेगवेगळे फायदे मिळतात. ठराविक – तयार पोषाखात आपण कीत्तेकदा अवघडलेपणे वावरत राहातो ,- यासाठी उपलब्ध कपड्यांचे वेगवेगळे काँबिनेशन – स्वतःच्या शरीर ठेवणीनूसार घरातच तयार करून घालणे. जाणीवपूर्वक शरीर- शिथिलीकरण प्रकार अनुभवणे.
*पायांमध्ये चप्पल, स्निकर्स शूज, बूट्स, स्पोर्ट्स शूज कधीतरी क्वचितच हिल्स घालून, अधून मधून जाणीवपूर्वक अनवाणी पायांनी, बागेतून टेकडीवरून वाहत्या पाणवठयातून चालले पाहिजे. रक्ताभिसरण सुधारुन शरीरांतर्गत क्रीयांचे संयोजन साधते.
- सकाळी आणि रात्री चहा कॉफी पिणे ऐवजी आठवडाभरात आलटून-पालटून हळद- कारले काढा, हळद दूध, इलायची दूध, अद्रक पाणी, त्रिफळा चूर्ण काढा, लिंबू मध सरबत, गुळ पाणी, नारळ पाणी, कोथिंबीर युक्त ताक, आवळा सरबत, कोकम सरबत, सोलकडी, उसाचा रस, खजूर सरबत, कोरफड सरबत, हे सकाळी किंवा रात्री ग्लासभर कपभर पिल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात.
*आठवड्यातून जाणीवपूर्वक दोन किंवा चार वेळेस दुपारी म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा सकाळी नाश्त्यानंतर जेवण आधी मिक्स फ्रुट डिश, ज्यूस खाल्ले पिले पाहिजे यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविधरंगी मौसमी फळांचा समावेश असेल तर विविध आरोग्यदायी लाभ होतात.
*दुपारच्या व संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधीच्या जेवणावेळी उपलब्ध असणाऱ्या सर्व हिरव्या कच्च्या तसेच रंगीबेरंगी फळभाज्या मिक्स सलाड खाल्लं पाहिजे.
*आठवड्यातून दोन ते तीन वेळा संध्याकाळी दुपारी किंवा सकाळी नाष्टा सोबत शक्य तेवढ्या वेगवेगळ्या सुक्यामेव्याच्या सुंठवड्याचा- लाडूंचा किंवा मिक्स अशा मूठभर सुकामेवा यांचा आहारात समावेश झाल्यानेही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
*स्वयंपाक घरात आलटून-पालटून महिनाभरात वेगवेगळ्या तेलांचा, लोणी, तूप, नारळ तूप समावेश झाला पाहिजे त्यामुळे शरीराच्या योग्य त्या स्निग्धतेने भरण-पोषण मिळते.
*मिक्स डाळीचे सूप, आलटून-पालटून डाळींची आमटी, मिक्स डाळीचं सांबार, तसेच मोड आलेल्या कडधान्याची उसळ, यांचाही समावेश शरीराच्या प्रथिनांची योग्य गरज भागवतात.
*भाकरीचे ही वेगवेगळे प्रकार ज्वारी- बाजरी- नाचणी- सातू अशा पद्धतीने तसेच चपात्यांची वेगवेगळे प्रकार फुलके घडीची चपाती पुऱ्या खाल्ल्याने आहारातील विविधता आरोग्यदायी ठरते. याशिवाय मिक्स धान्य भाकरी- भाजणी थालीपीठ- धपाटे -पराठे यांचाही आहारात समावेश असला पाहिजे.- भात इडली यांच्यामध्ये ही विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळे रंगीबेरंगी फळभाज्या यांचा उपयोग करून प्रयोग करता येतात.
*दूध- दही- तूप- लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा उपयोग आहारात आपल्याला अनेक फायदे देऊन जातो विशेषतः चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने केलेले दही आपल्याला भरपूर प्रमाणात अनेक आरोग्यदायी सत्व तत्त्व पुरवते म्हणून साखर-खडीसाखर दही, गुळ दही, सैंधव मीठ घातलेले दही, नुसते दही हे वाटी भर- कपभर असे जेवणानंतर जेवणासोबत सकाळी संध्याकाळी आठवड्यातून तीन-चार वेळेस घेतले गेले पाहिजे सकाळ दुपारच्या जेवणात आठवड्यातल्या किमान चार ते तीन ते चार दिवस तरी ग्लास धर ताक पिले च पाहिजे. आयुर्वेदिक आहार शास्त्रानुसार शुद्ध दह्यापासून केलेले ताजे ताक हे शरीरातील त्रिदोष व इतर अतिव रसानाही समतोल करण्यासाठी तसेच आंतरिक शरीरशुद्धीसाठी ही, शरीराचे प्रमाणबद्ध ते साठी ही अनेकार्थांनी लाभदायक आहे.
*मोरपीस, मुखवास, मेतकूट, त्रिफळा चूर्ण, खोबरेल तेल किंवा तूप डबी, आलेपाक वडी, सुती हातरुमाल, मास्कस, soap strips, small fragrance essence bottle, डायरी पेन अशा व इतर उपयुक्त साधनं असलेली वैयक्तिक कीट सोबत राखणे, इतरांनाही भेट देणे.
*जाणीवपूर्वक आठवड्यातले किमान दोन दिवस ब्रह्म मुहूर्ता ला उठून सुखासन, प्राणायाम, ताडासन, चक्रासन, शशांकासन, सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, शवासन अशी योग साधना, योग उपचार करावा. त्यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध आहेच.- रुमी- भारतीय शास्त्रीय संगीत, किंवा स्वतःला आवडणाऱ्या व्हायोलिन, बासरी, तबला, सतार, पियानो अशा इंस्ट्रुमेंटल संगीताला निवांत ऐकत स्वतःला आवडणाऱ्या कोणत्याही रंगा रंगाच्या मंद प्रकाशात लाईट कलर थेरपी, (प्रकाश रंग संगीत उपचार) द्यावा- घ्यावा. यामुळे भावनिक मानसिक आध्यात्मिक आरोग्य वृद्धिंगत होते, सुमन ताजेतवाने प्रसन्न होते.
…म्हणूनच आहे त्या परिस्थितीत आहे त्या साधनांचा प्रभावी उपयोग करून आपल्या माणसांबद्दल योग्य तो कृतज्ञताभाव ठेवून पुन्हा नव्याने स्वावलंबी स्वयंशिस्तीची जीवन शैली अंगिकारण्या साठी कुटुंबातील सगळ्यां कडूनच आपापल्या भूमिका आपापली कामे पार पाडीत पुन्हा एकमेकांना शक्य तिथे शक्य तितके सहकार्य करीत, स्वतःसाठी व स्व कडूनही योग्य मानव्य अपेक्षा ठेवून पुन्हा जीवनाची घडी सुगत- सुस्थित करण्यासाठी सुमनाने सकाळी उठल्या उठल्या व रात्री झोपताना स्वतः सकट, सभोवतालच्या दृश्य अदृश्य सर्वच निसर्गसुलभ- परमेश्वरी- शुभ- चांगुलपणाच्या लक्षणांसाठी, सवयींसाठी, सकारात्मक आनंदी जीवन घटनांसाठी, धन्यवाद- कृतज्ञता युक्त प्रार्थना शब्द भावना आणि जाणीवपूर्वक श्वास उच्छवास घेत प्रसन्न -शुभेच्छा- सकारात्मक स्वयंसूचना देत इतरांसाठी सर्व कल्याणकारी प्रार्थनेची इच्छा अंतरात मनात श्वासांमध्ये व्यक्त करीत निवांतपणे जीवनाला जगत जाव!!! …सकाळी उठल्या- उठल्या, दिवसभरात शक्य तेव्हा व झोपताना, मध्यरात्री चुकून जाग आली तर तेव्हा, कुठल्याही नकारात्मक- अगतिक वेळेसही- कोणत्याही प्रकारच्या मनो- शारीरिक- भावनिक -कौटुंबिक सामाजिक -आर्थिक- राजकीय राष्ट्रीय -जागतिक अस्वस्थते च्या साठीही, यथाशक्ति प्रत्येक वेळेस काहीही खाता- पिताना, अंघोळ- स्नानादी करताना, शक्य तेव्हा जाणीवपूर्वक श्वास उच्छवास घेताना खालील पैकी आवडेल ती प्रार्थना श्रद्धापूर्वक- भक्तीभावाने- एकट्याने किंवा इतरांसह, मनातल्या मनात किंवा मोठ्या आवाजात म्हणावी:-
*Gratefuleness Prayer:-
“Thank you God, Nature, Universe- for all the Gratefulness, Happiness, Love, Healings, Health & Wealth!
Thank you for Peace & Harmony in All the Life!
May All beings be Happy!!!
सर्वे भवन्तु सुखिनः
सबका भला हो!
सगळ्यांचं कल्याण हो!
अंतरात्मा- निसर्ग-परमेश्वर- संपूर्ण विश्व म्हणते:-
तथास्तु! तथास्तु!! तथास्तु!!!
*Ho’oponopono Healing Prayer:-
I’m Sorry!
Please Forgive Me!
I love you!
I thank You!!!
(By keeping one hand on stomach area near belly point or over the chest area & one hand on the head)!
*सर्व मंगलम!
सर्व कल्याणम!
साधू!!तथास्तु!
ओम शांती शांती शांती!!!
…*म्हणून लक्षात घेऊ-
….”जमू शकत,…हो जमत, जमतच, पुन्हा नव्याने अस्सल समाधानी स्वच्छंद स्वानंदी निर्मळ निखळ आनंदी समतोल सर्वंमंगलं समावेशी जगायला!!!”
‘Health is the Real Wealth!’
Happy World Health Day & Days ahead to One & All!!!
Bravo! Ureka!! All Is Well!!! Thanks a LoTon! Best Of Luck!!!
Thank You! आभार! शुक्रिया!धन्यवाद!!! All the Best!!!
Supriya Rakh.