परिंचे : परिस्थितीमध्ये बदल घडवायचा असेल तर कष्टाशिवाय पर्याय नसतो, याची जाण ठेवून परिंचे गावातील ग्रामपंचायत महिला सदस्य शैला जाधव या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवून 449 मतांनी निवडून आल्या.

शैलाताई आणि त्यांचे पती संजय दादा यांनी जीवन संघर्षात हाल, अपेष्टा सहन केल्या. अशा प्रकारचे जीवन गावकऱ्यांच्या वाट्याला येऊन नये यासाठीच हा विजय मिळवला असल्याचे शैलाताई आत्मविश्वासाने सांगतात. परंतु एवढे मात्र नक्की, त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. ग्रामस्थांनावर कोणतेही संकट येवू नये यासाठी शैलाताई अविरतपणे प्रयत्न करणार आहेत. गावकऱ्यांच्या अडीअडचणी वर कायमच शासनाच्या विविध योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी परिंचे गावातील श्री काळभैरवनाथ ग्राम परिवर्तन पॅनल सर्वतोपरी मदत करणार आहे. आतापर्यंत गावातील राजकारणात व्यक्तींचे चेहरे बघून मदत केली जात होती. परंतु आता शैलाताई त्यांच्या नेतृत्वाने परिस्थिती बदलणार आहे. आता गावात गरजू लोकांना मदत मिळवून देण्यासाठी शैलाताई राजकारणात आल्या असल्याचे मान्य करतात.
ताईंच्या राजकारणात उतरण्याच्या निर्णयाला त्यांचे पती संजय दादा यांची खंबीर साथ होती. शैलाताई यांचे चिरंजीव पुष्कराज जाधव हे देखील पुरंदर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यांनी देखील शैलाताई मध्ये जिंकून येण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. गावकरी तसेच संपूर्ण जाधव कुटुंबातील सदस्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच शैलाताई खंबीर मतांनी परिंचे ग्रामपंचायत वर खंबीर विजयाच्या मानकरी ठरल्या.



शैलाताईंनी जीवन संघर्ष खूप जवळून बघितला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ताईंनी कायमच कठीण परिस्थितीतून मार्ग काढला आहे. परंतु हे सोपे नव्हते, या दोघांना एकच माहिती होतं की, ते म्हणजे कष्टाची कास धरावी लागेल. कारण परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्ट हाच एकमेव पर्याय असतो. कठीण परिस्थितीत समाधानी जीवन कसे जगायचे हे सूत्र शैलाताई जाधव यांना चांगलेच अवगत आहे.
शैलाताईंनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाज्यांची विक्री केली. तर संजयदादा यांनी अनेक वर्ष ऑटो चालवली. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी या दोघांनी अधिक कष्ट करण्याचे ठरवले. पडेल ते काम करू लागले. त्यातूनच हळूहळू शैलाताई आणि संजय दादा यांचे जीवन समृद्ध बनत गेले. त्यांच्या कष्टांमुळे परिंचे गावात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. यासाठी गावकऱ्यांना ते अधिकच जवळचे आणि आपलेसे वाटू लागले.

संजय दादांना खऱ्या अर्थाने खडतर परिस्थितीत साथ दिली ती शैलाताईनी. संजय दादा परिस्थितीमुळे हताश झाले की शैलाताई त्यांना सांगायचा आपण कष्ट करून मुलांना शिकवू आपल्यासारखी परिस्थिती त्याच्या नशिबी येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहू. आज त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
शैलाताई आणि संजय दादा यांना आत्तापर्यंतच्या जीवनप्रवासात एक चांगलेच अवगत झाले होते, ते म्हणजे आपल्याला समाजाचे काही देणे लागते. यातूनच दोघांनी समाजकार्याला सुरुवात केली. शैलाताई आणि संजय दादा यांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. या बाबीला संपूर्ण जाधव कुटुंबीयांची देखील साथ होती. संपूर्ण कुटुंब शैलाताई आणि संजय दादा यांच्या मागे खंबीरपणे उभे होते. यामुळेच निवडणुकीच्या काळात तिन्ही मुलांसह, गावकऱ्यांनी शैलाताईंना मदत केली. शैलाताईचे चिरंजीव पुष्कराज जाधव समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय झालेत. पुष्कराज जाधव हे पुरंदर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पुष्कराज जाधव यांना दोन बहिणी आहेत. अश्विनी निंबाळकर आणि प्रियंका जाधव, या दोघी बहिणी उच्चशिक्षित आहेत.

गावामध्ये जाधव कुटुंबीयांनी लोकवर्गणी तसेच स्वखर्चाने मंदिराचे सुशोभीकरण केले. हे मंदिर संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. शैलाताई जाधव आणि त्यांचे चिरंजीव पुष्कराज जाधव यांच्याकडे समस्या घेऊन येणारे कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. गरजू व्यक्तीला जाधव कुटुंबिय सर्वतोपरी मदत करतात. शैलाताई यांना सावित्रीबाई फुले हा उत्कृष्ट माता पुरस्कार देखील मिळाला आहे. शैलाताईन कडे कायमच आदर्श पत्नी, आदर्श माता आणि उत्कृष्ट राजकारणी म्हणून बघितले जाते
प्रत्येकाशी जुळवून घेण्याच्या स्वभावानेच त्यांनी ग्रामस्थांच्या मनावर राज्य मिळवले आहे. याची प्रचिती म्हणजेच ग्रामपंचायत निवडणुकीवर मिळवलेला विजय होय. गावामध्ये कायमच गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, आरोग्याची, रस्त्यांची समस्या भेडसावत असते. या समस्येवर तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमचा पर्याय शोधून शैलाताई ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलताना शैलाताई म्हणाल्या की, परिंचे गावाच्या विकासासाठी सुप्रियाताईंनी 90 लाखाचा निधी मिळवून दिला. या आधी कुठल्याही पक्षाने अशा प्रकारचा निधी गावाच्या विकासासाठी मिळवून दिला नाही. यासाठीच संपूर्ण गावाचा पाठिंबा राष्ट्रवादी पक्षाला आहे. आमच्या पॅनल ला निवडून देऊन ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षावर निष्ठा दाखवली आहे. आता श्री काळभैरवनाथ ग्राम परिवर्तन पॅनल लोकांसाठी काम करेल, असा ठाम विश्वास शैलाताईंनी व्यक्त केला आहे
शैलाताई आणि संजय दादा यांच्या जीवनातून एक मात्र निश्चित म्हणता येईल की, त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास प्रत्येकाला उभारी देण्यासह कठीण प्रसंगाशी लढण्याचे बळ देण्याचे काम करतो. अशा या खंबीर नेतृत्वाच्या शैलाताईंना द पब्लिक व्हॉईस न्यूजचा मानाचा मुजरा.