
- मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने नियोजन
- मराठा बांधवांनी सहभागी व्हावे
- दोन दिवसांची संघर्ष यात्रा
पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली. - यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याचे राजेंद्र कोढंरे ,रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर,सचिन आडेकर, नाना निवंगुने ,हानुमंत मोटे,अनिल ताडगे,धनंजय जाधव,मीना जाधव, प्राचीताई दुधाने,दिपाली पाडाळे किशोर मोरे,यांसह समन्वयक उपस्थित होते.
- ही संघर्ष यात्रा दि. 4 फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघणार असून 5 फेब्रुवारी रोजी जालना येथे पोहोचणार आहे. दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपतींना पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रोड, वाघोली, शिक्रापुर, राजंणगाव, शिरूर, सुपा, नगर, आमळनेर मार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 5 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजता बीड येथून पुन्हा सुरुवात होणार आहे. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यताील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.
आरक्षणासाठी 23 मार्च 1982 साली स्व.आण्णासाहेब पाटील यांनी पहिले आत्मबलिदान दिले. तेंव्हापासुन सुरु आसलेला आरक्षणाचा लढा मागील 3-4 वर्षात तिव्र झाला. कोपर्डीच्या ताईवरच्या निर्घुन अत्याचारानंतर मराठा पेटुन उठला आहे. तरी हि लढवय्या या मराठ्यांनी संयम न सोडता सर्वांनी कौतुक करावे एवढ्या शांततेत जगातील सर्व मराठा बांधवानी 58 मोर्चे काढले. शांततापुर्व लढ्यात ही
आपलचे 42 मराठा तरुण आरक्षणासाठी शहिद झाले, 14,523 मराठा तरुणावर गुन्हे दाखल झाले.