जिथे स्वच्छता आहे तिथे सरस्वती ही विद्येची देवता वास करते : नगरसेविका मंजुश्री खर्डेकर
पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे समूह शिल्प उभारण्याचा निर्धार – संदीप खर्डेकर
पुणे : शाळा सुरु झाल्या असल्या तरी अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी आणि त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.आज प्रदीर्घ कालावधीनंतर ५वी ते ८ वी चे वर्ग सुरु झाले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पुणे मनपा च्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.विद्यार्थ्यांनी मास्क चा वापर,सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर चा स्वतः वापर करावाच पण त्याच बरोबर त्यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांना ही त्रिसूत्री पाळण्यास प्रेरित करावे असेही ते म्हणाले.मोठ्या खंडानंतर शाळा सुरु होत आहेत त्यामुळे यावर्षी परीक्षा बहुधा एप्रिल मधे होतील पण पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होइल अशी अपेक्षा करूयात असेही ते म्हणाले.सर्व विद्यार्थ्यांना मास्क आणि चॉकलेट देउन त्यांचे स्वागत करण्यात आले.

जेथे स्वच्छता असते तेथे सरस्वती वास करते हे मुलांनी लक्षात घ्यावे व सतत हात धुण्याची व मास्क वापरण्याची सवय लावून घ्यावी असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.तसेच विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता न्यू नॉर्मल ला सामोरे जावे व नविन जीवनपद्धती आत्मसात करावी असेही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष प्रकाश बालवडकर,भाजपचे प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे,सरचिटणीस ॲड.प्राची बगाटे,निलेश गरुडकर ,अमोल डांगे,जयश्रीताई तलेसरा,संगीताताई शेवडे,सुवर्णाताई काकडे,अपर्णाताई लोणारे,मंगलताई शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय आहे.अश्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र व त्यांच्या पुतळ्याची उभारणी व्हावी तसेच एरंडवणे येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे डॉक्टरांच्या कार्याचे व त्यागाचे स्मरण करणारे समूह शिल्प उभारण्याचा संकल्प सोडत असल्याचे भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शशीकला चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.