पुणे : जुन्या सांगवीमध्ये गोळीबार सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पती, पत्नी दोघेही रात्री शतपावली करीत असताना अचानक रात्री एका अज्ञात इसमाने येऊन गोळी झाडली. आनंद सोळंकी या इसमाला गोळी लागून खाली कोसळला. त्याची पत्नी मनीषा सोळंकीने तिथे असलेल्या नागरिकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना परिमंडळ दोनशे पोलीस उपायुक्त आनंद भोईत यांनी सांगितले की जेवण झाल्यानंतर आनंद सोळंकी व त्यांची पत्नी मनीषा सोळंकी हे शतपावली करण्यासाठी त्यांच्या घराच्या परिसरामध्ये फिरत होते.त्या संशयितांनी मागून घेऊन गोळी झाडली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.