पुणे : जानेवारी : आमदार माधुरी मिसाळ यांची पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
मिसाळ सन २००९ पासून सलग तीन वेळा पर्वती मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. सध्या विधानसभेतील भाजपच्या प्रतोद म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. राज्य शासनाच्या ‘सार्वजनिक उपक्रम समिती’ आणि महिला सबलीकरणासाठी स्थापन केलेल्या ‘शक्ती कायदा समिती’च्या त्या सदस्या आहेत.
प्रदेश चिटणीस, पुणे शहर अध्यक्ष, बारामती लोकसभा प्रभारी अशा विविध संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले आहे.