पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या वतिने व शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्षा उमाताई गिरीष खापरे यांच्या उपस्थिती मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक मोर्चाचेच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे प्रकरणी भाजपा महिला आघाडीने त्यांनी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या वेळी उपस्थित. प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, शहराध्यक्षा अर्चनाताई पाटील, पुणे शहर सरचिटणिस कांचनताई कुंबरे,
पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख सोनालीताई भोसले नगरसेविका स्वातीताई लोखंडे, मंजुश्री खर्डेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके शहरातील सर्व प्रमुख, पदाधिकारी,मंडल अध्यक्षा,सर्व आघाडी अध्यक्षा,नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते