पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार गिरीश बापट यांनी एम एन जि एल च्या साह्याने पुणे शहर सिलेंडर मुक्त करण्याचा निर्धार केला. एम. एन. जि. एल. च्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली होती. एम. एन. जि. एल. चे संचालक राजेश पांडे, एम. एन. जि. एल. चे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदार, वाणीज्यीक संचालक संतोष सोनटक्के उपस्थित होते.
यावेळी गिरीश बापट यांनी सांगितले की, लवकरच एम. एन. जी. एल. मुळे संपूर्ण पुणे शहर सिलेंडर मुक्त करण्याचे नियोजन केले आहे. येणाऱ्या वर्षभरात एक लाख घरांमध्ये थेट पाईपलाईन लाख घरांमध्ये थेट पाईपलाईन द्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी बापट म्हणाले की, पुण्यातील सोसायटी मेंबर्सनी एकत्र येऊन पाईप लाईन द्वारे गॅस घेण्याची तयारी दाखवली तर. गॅस जोडणीसाठी रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची देखील योजना आहे. तसेच आटो चालकांना याचा लाभ घेता येईल.
तसेच एखाद्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन आहे. परंतु गॅसपुरवठा नाही. अशा सोसायटीनी गॅस जोडण्यासाठी आधीच प्रयत्न केला असेल तर तेथील नागरिकांना 1000 रुपये पर्यंतची रक्कम माफ करण्याचे नियोजन एम. एन. जि. एल. कंपनीने केले आहे. रिक्षाचालकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सीएनजी किट कर्जासाठी खास योजना करण्यात आली. रिक्षाचालकाने कर्जाची मुद्दल भरावी. मुदलावरील व्याज स्वतः एम एन जि एल कंपनी भरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रिक्षाचालक योजनेकडे आकर्षित होतील.
पुणे शहर सिलेंडर मुक्त करण्याचा एम. एन. जि. एल. कंपनीने निर्धार केला आहे. येणाऱ्या काळात वर्षभरामध्ये पुण्यातील प्रत्येक घरांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केल्या जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी सीएनजी गॅस वापर करावा यासाठी खास सवलती देऊन त्यांना आकर्षित केले जात आहे.
हा गॅस वातावरण पूरक तसेच पर्यावरण पूरक आहे. पाईपलाईन द्वारे पुण्यात आतापर्यंत तीन लाखापेक्षा अधिक घरांमध्ये गॅसचा पुरवठा केल्या जातो. जानेवारी महिन्यात 22, 500 नवीन गॅस कनेक्शन घेण्यात आले. आहे. तसेच वर्षभरात एक लाख पाईपलाइन संकल्प पूर्ण होईल असा विश्वास केला.
यावेळी पांडे म्हणाले की एम. एन. जी. एल. मार्फत 32,0000 घरामध्ये गॅसचा पुरवठा केला जातो. तसेच शहरात सीएनजी स्टेशन मध्ये वाढ आहे . सध्या 108 स्टेशन कार्यरत आहे. मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तर एम. एन. जी. एल. ने पुणे शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.