पुणे : पुण्यातील झोपडपट्टी विकास प्राधिकरण अर्थात एस आर ए च्या कार्यालया बाहेर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आला आहे.
झोपडपट्टी धारकांची फसवणूक करणाऱ्या विकसका विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हा आंदोलन सुरू करण्यात आला आहे. 2010 साली पुणे शहरातील केळेवाडी येथील सिटी सर्व्ह नंबर 44 /1 या जमीनवर झोपडपट्टी तोडून त्याच ठिकाणी कुमार बिल्डर कडून एस आर ए प्रकल्प राबविण्याची योजना सुरू करण्यात आली.

मात्र 10 वर्ष लोटूनही कुमार बिल्डर कडून झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काच्या जागेवर घर बांधुन देण्यात आली नाहीत. असा दावा लहुजी शक्ती सेनेने केला आहे. झोपडपट्टीतील घर तोडल्या नंतर कुमार बिल्डर कडून पात्र आणि अपात्र अशा दोन्ही झोपडपट्टी धारकांना घर भाड्यासाठी दरमहिन्याला घर भाडं देण्यात येत होतं. मात्र मागील काही महिन्यांपासून पात्र झोपडपट्टी धारकांनाही कुमार बिल्डरने घर भाडं देणं बंद केलं आहे.
त्यामुळे आता राहायचं कुठे असा प्रश्न झोपडपट्टी धारकांना पडला आहे. एस आर ए कडे वारंवार तक्रारी करून देखिल एस आर ए संबंधित बिल्डरवर कारवाई करण्या ऐवजी बिल्डरला पाठीशी घालत आहे. बिल्डर आणि एस आर ए तील अधिकाऱ्याच आर्थिक सटलोट असल्याने संबंधित बिल्डरवर कारवाई होत नाही. अस लहुजी झोपडपट्टी धारकांच म्हणन आहे. झोपडपट्टी धारकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला ब्लॅक लिस्ट करण्यात याव.



13 जानेवारीला बिल्डर करत असलेली घराची लॉटरी प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. आणि झोपडपट्टी धारकांना त्यांचं थकलेलं घर भाडं बिल्डर कडून त्वरित मिळावा इत्यादी मागण्यांसाठी हा आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आणखी तीव्र पध्दतीने आंदोलन करू आणि त्या आंदोलनाच्या परिणामाची जबाबदारी एस आर ए ची असेल असा इशारा लहुजी शक्ती सेनेनं दिला आहे.