पुणे : पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. मांजरी बुद्रुक गावातील पाणी पुरवठा सुरू करावा या प्रमुख मागणीसाठी आर. पी. आयचे युवक अध्यक्ष गजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीवर चडून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

2017 ला मांजरी बुद्रुक येथे पाणी पुरवठा योजनेच उद्घाटन करण्यात आल होत. 24 महिन्यात हे काम कंत्राटदाराला पुर्ण करायच होत. मात्र 2021 उजळूनही पाणी पुरवठा अद्याप पुर्ण झाली नाही. त्यामुळे मांजरी गावच्या नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. त्याच बरोबर मांजरी रेल्वे उड्डाणपूलाचे काम जलद गतीने करण्यात यावं, गेले अनेक वर्षे रस्त्याचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे, मांजरी परिसरात कचरा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मागणी त्वरित मान्य न झाल्यास आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा गजेंद्र मोरे यांनी दिला.