बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसा कर्जपुरवठा करावा

पुणे : शेतीच्या कामांसाठी पतपुरवठा वेळेत होणे गरजेचे असते. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसा कर्जपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

सन २०२१-२२ हंगामासाठी पीककर्ज दर ठरवण्यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची (डीएलटीसी) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये सन २०२१-२२ हंगामाकरिता पुणे जिल्ह्यासाठी पिक कर्ज दर निश्चित करण्यात आले. तसेच दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालनासाठी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता दर निश्चित करण्यात आले.

बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा विकास प्रबंधक (नाबार्ड) नितीन शेळके, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले, जिल्हा अग्रणी बँकेचे सरव्यवस्थापक किरण अहिरराव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह समिती सदस्य व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी समिती सदस्य व शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतीपिके, पतपुरवठा आदी विषयी संवाद साधला. हंगामातील प्रमुख पिके, ऊस लागवड नवीन पद्धती, ठिबक सिंचन द्वारे पाणी पुरवठा, डाळिंब पिकासाठी लागवड, बाजारपेठ नियोजन तसेच पिक कर्ज दराबाबत डॉ.देशमुख यांनी चर्चा केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »