गुटका किंग जेएम जोशी पुणे पोलिसांच्या रडारवर

पुणे : पुणे पोलिसांनी दोन महिन्यापासून गुटखा विरोधी मोहिमेत सुरुवात केली आहे अशातच पुणे पोलिसांनी चक्क 15 कोटी चा गुटखा जप्त करून. तो बंदी असतानाही महाराष्ट्र मध्ये कसा वितरित होतोय याची सखोल चौकशी सुरू आहे सध्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुटख्यापासून कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन त्वचा कुटुंब उध्वस्त होतात. गुटख्यावर बंदी असूनही तो पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे वितरित केला जातोय याला आळा बसण्यासाठी पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यात 28 ठिकाणी छापे टाकून मोठया प्रमाणात अवैध गुटखा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे जप्त केला आहे.



सदर गुन्हयातील आरोपींचे चौकशी दरम्यान गुजरात राज्यात वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्वासा “गोवा’ या नावाने प्रतिबंधित गुटखा उत्पादन केले जात असल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार पुणे पोलीसांचे युनिट चारचे पथकाने सिल्वासा येथे काशी व्हेंचर्स या कंपनीवर छापा टाकून 15 कोटींचा गुटखा व गुटखा बनविण्याचा कच्चा माल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. याप्रकरणात गोवा गुटखाचे मालक आणि गुटखाकिंग जे.एम.जोशी यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांचेवर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
शहरातील गुटखा रॅकेटवर छापामारी सुरु करताना पोलीसांनी सुरुवातीला चंदननगर हद्दीत 17 नोव्हेंबर रोजी सुरेश अग्रवाल, अक्षय अग्रवाल, आकाश अग्रवाल, प्रविण वाहुळ, निरज सिंगल यांचेवर गुन्हा दाखल करुन सात लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा आणि वाहने जप्त केली. या गुन्हयाचा तपास युनिट चारचे पथकाचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल करत असताना, तपासात प्रतिबंधीत गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत माहिती देताना म्हणाले की याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर, चौकशी दरम्यान अवैध गुटख्याचे उत्पादन व वितरण हे वापी (गुजरात) व सिल्वहासा (दादर नगरहवेली) येथे अवैधरित्या होत असल्याची माहिती मिळाली. तेथून माल घेऊन त्याचा मोठया प्रमाणावर पुरवठा चोरटया मार्गाने अटक आरोपींच्या मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. आत्तापर्यंत पाच ठिकाणांवर छापे टाकून सुमारे चार कोटी रुपये इतकी रक्कम जप्त केली.