
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतातील मुस्लिम हे जुने ब्राम्हण आहेत. असे वक्तव्य त्यांनी कणकवली येथे केले. यामुळे पुण्यामध्ये ब्राह्मण महासंघाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करत माफी मागण्याची मागणीदेखील करण्यात आली.

पुणे शहर ब्राम्हण महासंघ निषेध केला असुन त्यांनी याबद्दल आपली भुमिका स्पष्ट केली नाही. तर पुण्यातील त्याच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.

असे अनंत दवे यांनी सांगितले. यावेळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी संभाजी महाराजाच्या पुतळयाला पुष्पहार घालुन कार्यकर्त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील याचा निषेध करण्यात आला.

