शॉर्ट सर्किट ने आग लागल्याची चर्चा.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
मृत्युमुखी बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतीची घोषणा



भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली होती. या आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याने 10 नवजात बालकांना जीवदान मिळेल का असा प्रश्न देखील सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

शनिवारी मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्या पैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू धुरामुळे गुदमरून झाला असल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात येत आहे. या घटनेने परत एकदा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभार चव्हाट्यावर आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील शनिवारी रात्री अचानक आऊट बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकांनी पाहिले. नंतर त्या नातेवाईकाने नर्सला या संदर्भात संपूर्ण माहिती दिली.

नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून येत होते. परिचारक यांनी संबंधित घटनेची माहिती तात्काळ अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता.

या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक