पुणे : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार संजय जगताप, माजी आमदार मोहन जोशी, विभागीय आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना वरील लसीकरणाच्या नियोजनाची माहिती घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर चा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी खबरदारी घेणे आवश्यक आहे. महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पुण्यातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोरोना विषणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »