पुणे : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय महिला संसद दि. ११ ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. महिलांमधील नेतृत्व ४.० : शक्ती, विकास आणि बदल (Women in Leadership 4.0: Power, Progress & Change.) हा या संसदेचा प्रमुख विषय आहे.

दुसर्या महिला संसदेचे उद्घाटन सोमवार, दि. ११ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २.०० होणार आहे. या समारंभासाठी माजी केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या राज्यापाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, खासदार डॉ. दिव्या कुमारी, सुप्रसिद्ध नृत्यंगणा पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई, द कॉमन वेल्थच्या महासचिव पार्टीशिया स्कॉटलँड, पार्श्वगायक पद्मश्री कैलास खेर, आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रितू छाब्रिया या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून दुसरी राष्ट्रीय महिला संसद भरवली जात आहे.
गुरूवार, दि. १४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वा.या महिला संसदेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडच्या राज्यपाल श्रीमती द्रौपदी मुरमू , नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापकीय सदस्य व थोर समाजसेविका मेधा पाटकर, सेवाच्या संस्थापिका पद्मभूषण डॉ. ईलाबेन भट, आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती राजश्री बिर्ला, युकेच्या हाउस ऑफ लॉर्डच्या सदस्या संदीप के. वर्मा, खासदार प्रणित कौर, जम्मू येथील महाराजा हरिसिंग ट्रस्टच्या उपाध्यक्षा श्रीमती रितूसिंग हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महिला संसदेमध्ये नऊ सत्रे आयोजित केली आहेत. संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
सत्र १ : औद्योगिक नेतृत्व-(स्त्रीत्वाचा पाठपुरावा-जगाची पुर्नरचना)
सत्र २ : स्वयंसेवी संस्था-(आरोग्यसेवेकडे केंद्रीकरण)
सत्र ३ : राजकीय नेतृत्व-(महिला २.०, शक्ती, आवड आणि राजकारण)
सत्र ४ : औद्योगिक व्यवस्थापन
सत्र ५ : औद्योगिक नेतृत्व-(भारताचे नायक आणि बदलाचे वारे)
सत्र ६: सृजनशीलता/माध्यमे/चित्रपट-(चित्रपट, संगीत व कला:स्त्रियांचे क्षेत्र पण पुरूषी वर्चस्व)
सत्र ७ : क्रीडा-(निपुणतेचा पाठपुरावा, भावी पिढ्यांना प्रेरणा)
सत्र ८ : संशोधन व सृजनशीलता-(एकाकडून अनेकत्वाकडे संशोधन व सृजनशीलतेला प्रेरणा)
सत्र ९ : महिला आणि अध्यात्म-(उत्तमत्व व उत्कृष्टतेसाठी अध्यात्म)
या संसदेत कर्नाटकच्या महिला व बाल विकास मंत्री श्रीमती जॉली शशीकला अण्णासाहेब, कु.मोना भारद्वाज, रेणु कर्नाळ, कन्नेगी पोक्कियानाथन, पद्मश्री डॉ. राणी बंग, डॉ. गिरीष कुलकर्णी, आमदार प्रणेती शिंदे, डॉ. संगीता रेड्डी, डॉ. अदिती कराड, पद्मश्री अरूणाचलम मृगंथम, प्रा. राजेंद्र कचरू, लिलाबेन अंकोलिया, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, हरियाणाच्या आमदार किरण चौधरी, माजी खासदार कु. मिनाक्षी नटराजन, पंकजा मुंडे, डॉ. हर्षित पांडे, कर्नाटकच्या महिला परिषदेच्या अध्यक्षा प्रमिला नायडू, तेलंगणाच्या महिला व बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड, श्रीमती शायना एन.सी, अपुर्वा पुरोहित, डॉ. किरणमयी नायक, अमृता फडणवीस, विमला बाथम, लेखक राकेश आनंद बक्षी, पार्श्वगायिका उषा उथ्थूप, लेखक रितेश शहा, संगीत दिग्दर्शक सलिम सुलेमान, अरूणाचल प्रदेश महिला परिषदेचे अध्यक्ष अॅड. राचिलो चाई, हरिणाच्या महिला व बालविकास मंत्री कमलेश धांडा, अभिनेता संग्राम सिंग, ऋतूजा भोसले, दिपा मलिक, डॉ. बिनोटा मैना, डॉ. विद्या गौडे, उत्तर प्रदेशच्या महिला व बाल विकास मंत्री स्वाती सिंग, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस, रश्मी उर्ध्वरेषे, कु. डेझी ठाकूर, प्रीति भारद्वाज दलाल, डॉ. कृष्णकांत पाठक, देवीवैभव श्री, ब्रह्माकुमारी शिवानी बहन, प्रवजीका दिव्यानंदा प्राणा, एलिझाबेथ डेनले यांच्यासह राजकीय, माध्यम, सामाजिक, अभिनय व उद्योग क्षेत्रातील दिग्गज या संसदेमध्ये महिला सक्षमीकरणावर संबोधित करतील.


राष्ट्रीय महिला संसदेविषयी :
महिलांना एकत्र आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणारी अशी ही पहिलीच महिला संसद आहे. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही महिला संसद भरत असून, देशभरातून हजारो विद्यार्थिनी व तरुणी सहभागी होणार आहेत. महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम बनविणे हे या महिला संसदेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे देशभरात महिलांचे जाळे उभे राहील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड या महिला संसदेचे मार्गदर्शक आहेत.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी प्र-कुलगुरू प्रा. डी. पी. आपटे, डॉ. अनुराधा पराशर व डॉ. सुरभि जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.nationalwomensparliament.org