पुणे : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, विशाल कार्लेकर, मिलींद भिंगारे, सचिन बहूलेकर, ज्ञानेश्वर कोकणे, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, संतोष मोरे, चंद्रकांत खंडागळे, मोहन मोटे, संजय घोडके, जितेंद्र खंडागळे, विलास कुंजीर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी कर्मचारी आहि मान्यवर उपस्थित होते.

