बायकोवर छाप पाडण्यासाठी साड्या तसेच ऐवज चोरणारा अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : अंथरूण बघून पाय पसरावे अशी म्हण आहे, परंतु एका चोराने तर चक्क नवविवाहीत बायकोला इम्प्रेस करण्यासाठी लग्नसराईत जागरण गोंधळात चोरट्यासारखे घुसून महागड्या साड्या, ऐवज लपास करणाऱ्या अट्टल चोराला युनिट 5 च्या पोलिसांनी शिताफीने पकडून मुसक्या आवळल्या आहे.
दुचाकी, मोबाईल, चारचाकी चोरण्याची सवय असलेल्या चोराने खास बायको साठी लग्नसराईमध्ये साड्या व महागडा येवज चोरण्याचा तगादा लावला होता.
रोहन बिरू सोनटक्के (वय 21, रा.वारजे माळवाडी) असे या आरोपीचे नाव. आतापर्यंत या चोराने शहर आणि राज्यभरात 9 ठिकाणी चोऱ्या केल्याचे पुढे आले. तपासमध्ये 18 मोबाईल, 3 लॅपटॉप, काही दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या चाव्या असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
आरोपी रोहन सोमवारी (दि.28) सकाळी ॲमेेनोरा मॉलच्या पाठीमागे चोरी केलेला मोबईल विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती युनिट 5 कडून मिळाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे अशोक मोराळे, पोलिस उपआयुक्त बच्चनसिंग यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ट पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली सपोनि प्रसाद लोणारे, पोलिस अंमलदार महेश वाघमारे, प्रविण काळभोर, राजेंद्र भोरडे, विशाल खंदारे, संजय दळवी, अश्रुबा मोराळे, दत्तात्रय ठोंबरे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. या आरोपिकडे इतर मुद्देमाल तसेच चोरीची कसून चौकशी करणार आहेत.