
पुणे : नुकताच पुणे महानगरपालिकेमध्ये तेवीस गावांचा समावेश झाला आहे. हे करून राज्य सरकारने मदतीचा आखडता हात घेतला असल्याचा आरोप पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी राज्य सरकारवर केला आहे. पुण्यातील समावेश होणाऱ्या सर्व गावांना न्याय द्यायचा असेल तर त्याची गरज आहे त्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे मग गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

येणाऱ्या काळामध्ये समाविष्ट गावांचा वर अन्याय होऊ नये म्हणून पुण्यात तिसरी महापालिका करण्यास आमचा विरोध नाही. यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. यासाठी एक पाऊल पुढे उचलत याबाबतचा आमचा सर्व्है सुरु आहे.अस स्पष्टीकरण पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे.

पीएपीएमला केंद्र सरकारच्या माध्यमातुन 150 ई-बसेस मिळणार आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरं तर 23 गावे पुणे महापालिकेत आली असुन याकरता पुणे महापालिकेला राज्य सरकारने मदत केली नाही. पण तिसरी महापालिका करायची झाल्यास तिची हद्द, लोकसंख्या,एकुण जागा याबाबत चर्चा होणे गरजेचे असुन याकरता आमचा सर्व्है सुरु आहे. अस गिरीश बापट यांनी सांगितले.