पुणे : कोथरूड परिसरात सकाळी सातच्या सुमारास रानगवा शिरला ही बातमी पुण्यात वाऱ्यासारखी पसरली. त्याचे पुढे काय यातच पाच तासाच्या रेस्क्यू नंतर त्या रानगवाचा दुर्दैवी मृत्यू ही बातमी येऊन ठेपली. शेवटी काय तर माणसांच्या जंगलात येऊन रान गव्याला त्याचा प्राण गमवावा लागला.
कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटी मध्ये अचानक या गवाने प्रवेश केल्यानंतर नागरिकांमध्ये हाहाकार उडाला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी या गोव्याला सर्वात प्रथम पाहिले. नागरिकांनी ही बातमी अग्निशामक दलाला कळवली. त्यानंतर मात्र रस्त्यावर गवाला बघण्यासाठी तुडुंब गर्दी जमा झाली. यामुळेच गवा आणखीनच बिथरला आणि कोथरूड परिसरामध्ये इकडे, तिकडे पळू लागला. सकाळपासून सुरू झालेले झालेले रान गोव्याचे रेस्क्यू ऑपरेशन पाच तास चालले.
परंतु तरीही गवाचा प्राण वाचविण्यात यश मिळू शकले नाही. पाच तासाने रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जंगल सोडून माणसांच्या वस्तीत येणे हेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.
तब्बल दहा फुटाची भिंत ओलांडून हा गवा सैरावैरा पळू लागला. वन विभाग विभाग, अग्निशामक दल यांनी या गोव्याला पकडण्यासाठी चक्रव्यूह आखला. अग्निशामक दलाने जाळी लावून गवाला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु गवा जाळीत तोडून पळाला. त्यानंतर त्याला दोन ते तीन वेळा डॉट म्हणजेच म्हणजेच बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देखील देण्याचा प्रयत्न केला गेला.
तरीदेखील हा रानगवा रेस्क्यू टीमच्या हाती लागण्याऐवजी पळत सुटला. नागरिकांची गर्दी बघून सुसाट रस्त्यावर पळायला लागला यातच अनेक गाड्यांवर तसेच घरांच्या गेटवर धडका घेत होता. त्याच्या नाका तोंडातून रक्त देखील पाह्यला मिळत होते. मात्र काही वेळा नंतर हा गवा रेस्क्यू टीमच्या हाती लागला. पाच तासानंतर गवाच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली.