
पुणे : महाराष्ट्रातील तारा दूतांनी सारथी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले. तारादूत प्रकल्प वरील स्थगिती लवकरात, लवकर मागे घेऊन नियुक्ती द्या, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. तसेच तारा प्रकल्पाची व्याप्ती वाढून त्याला गती देण्याची मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. हे आंदोलन पुणे येथील सारथी कार्यालयापुढे करण्यात आले.