पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार
संग्राम संपतराव देशमुख यांच्या पदवीधरांसाठी
संकल्प पत्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मंत्री
आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. आठ संकल्पांचे संकल्प पत्र प्रकाशित करताना म्हणाले की हे आठवी संकल्प वास्तवात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, हे आठ संकल्प संग्राम देशमुख पूर्ण करतील तरी त्यांच्यावर सर्व पदवीधरांनी विश्वास ठेवण्याची गरज आहे. यावेळी पुणे शहर संघटन सरचिटणीस व पदवीधर निवडणुकीचे प्रमुख राजेश पांडे, पुणे प्रभारी गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, दीपक पोटे, राजेश येनपुरे,युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशील मेंगडे योगेश बाचल इ. मान्यवर उपस्थित होते.