पुणे : सासू – सुनेच नात्यात नेहमी कटुता असते, असा समज आपल्या समाजात बऱ्यापैकी रुजला आहे. मात्र याच समजाला अपवाद ठरलेलं एक कुटुंब पुण्यातील मुळशी तालुक्यातील आंग्रे वाडीत आहे.

आंग्रे वाडीतील 87 वर्षाच्या आजीबाई हिराबाई आंग्रे यां कोरोना वायरस वर मात करून घरी परतल्या. घरी परतल्या नंतर हिराबाईच्या सुनबाई निर्मला यांनी ज्या पद्धतीने हिराबाईच स्वागत केलं, त्याने संपूर्ण
आंग्रे वाडी भारावून गेली. हिराबाई कोरोना वर मात करून घरी परत आल्यानंतर निर्मला यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह रस्त्यावर फुल टाकून हिराबाईच स्वागत केलं.

यावेळी निर्मला यांचे डोळे आनंद अश्रूंनी दाटून आले. माझ्या सासूबाईंनी नेहमीच मला आपल्या मुली प्रमाणे सांभाळलं, आमच्यात कधीच रुसवे – फुगवे झाले नाही, त्यामुळे त्यांच स्वागत करताना मला आनंद अश्रु अनावर झाले अस निर्मला यांनी सांगितलं