पुणे : जिल्हयातील गावांमध्ये शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील कचरा समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहे. याकरिता ग्रामस्थांचे व लोकप्रतीनिधींचे सहभाग व समन्वयातून गावनिहाय सुक्ष्म नियोजन करुन कच-याची समस्या सोडविता येणार आहे. याकरिता जिल्हा परिषद मार्फत सर्व गावात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत करुन सर्व गावे स्वप्नवत स्वच्छ व सुंदर करुन देशात एक मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार आहे.
याकरिता MIDC हिेजवडी यांचेकडून हिंजवडी, माण, म्हाळूंगे व इतर गावचे कचरा प्रकल्पाकरिता तुपे, मुख्य अभियंता यांनी 5 एकर जागा जिल्हा परिषदेस आरक्षीत करुन दिलेली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानले.
याकरिता कचरा व्यवस्थापन बरोबरच गावाचे सौदर्यीकरन करावयाचे आहे. यासाठी गावस्तरावर कचरा संकलन, त्याचे व्यवस्थापन, जिथे जागा नाही त्यागावासाठी जागाउपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सर्वांनी याकामात प्रगती दाखवावी असे आवाहन आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे यांनी केले आहे.
13 ऑक्टोबर रोजी हिंजवडी येथे हिंजवडी, माण व म्हाळूंगे या IT पार्क असलेल्या ग्रामपंचायतींची घनकचरा व्यवस्थापन बाबत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली होती याप्रसंगी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे यांनी बैठकीस उपस्थितांना दुरध्वनी व्दारे संबोधीत केले. याप्रसंगी शंकर मांडेकर, जि. प. सदस्य, मिलींद टोणपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व), तुपे, मुख्य अभियंता MIDC, चव्हाण अधिक्षक अभियंता MIDC,
मोडवे, कार्यकारी अभियंता MIDC, कोंडे, हिजंवडी औद्योगीक असोसीएशन, कुळकर्णी, प्रादेशीक अधिकारी, क्रेडाई, PMRDA चे प्रतिनिधी, देशमुख, रेसिडेंशल क्लब, सुनिल जाधव, विस्तार अधिकारी व गा्रमविकास अधिकारी श्री. रायकर, हिंजवडी, श्री. पाटील, माण व श्री. नवले, म्हाळूंगे उपस्थित होते.याप्रसंगी शंकर मांडेकर यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या जबाबदारी प्रमाणे कामे केल्यास कोणत्याही समस्या उदभवणार नाही. MIDC कडून प्राप्त जागेवर या तीन गावाप्रमाणेच तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींचे कचरा प्रक्रीया करिता कचरा घेण्यात येणार आहे. मुख्य अभियंता यांनी 5 एकर जागा जिल्हा परिषदेस आरक्षीत करुन दिलेली आहे. याबद्दल त्यांचे जनतेच्या वतीने आभार मानले.
उपलब्ध जागेवर कचरा प्रक्रीया प्रकल्प कार्यान्वीत करिता जिल्हा परिषद मार्फत नियोजन करुन प्रकल्प उभारणी करण्यात येणार असल्याचे मिलींद टोणपे, उपमुख्य कार्यकारी अधकारी पाणी व स्वच्छता, जि. प. पुणे यांनी म्हटले.