मंदिर उघडा… गर्दी करा… श्रध्देपोटी जाणारी भोळीभाबडी माणसं मरू द्या…! व्वा खेळ मांडलाय.
पुणे : सरकार किंवा विरोधक चांगली आरोग्य सुविधा देऊ शकले नाहीत. हजारो चांगली माणसं मरताना सुध्दा (३३ कोटी पैकी) कोणताही देव माणसं वाचवायला आला नाही. अंधभक्तानों… जागे व्हा. पुजाऱ्याचे हित बाजूला ठेवा.थोडे दिवस थांबा. श्रध्दा सर्वश्रेष्ठ असते, मास्क वापरून घरच्याच देवाला (पुजा) नतमस्तक व्हा… मंदिरासाठी सगळा स्टंट चालू आहे. अशी काटेकर भूमिका संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी मांडली.