संभाजी ब्रिगेडचे आवाहन
पुणे : सोशल मीडिया जातीवादी होत चाललेला आहे. चार-पाच दिवसात वारसा सांगणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे तरुण मुलं अत्यंत जातीयवादी, टोकाची भाषा बोलत आहेत आणि त्यामुळे क्रियेला-प्रतिक्रिया म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अशी खंत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी व्यक्त केली.
सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य समोर येत आहेत. कृपया हे थांबलं पाहिजे. समाज माध्यमांचा मधील चुकीच्या वक्तव्यामुळे विद्वेषाचे राजकारण करून सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरू आहे. पोरांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होत आहेत, हे थांबले पाहिजे असंही संतोष शिंदे यावेळी म्हणाले.

