पुणे : राष्ट्रगीत गाताना आपण ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा…’! हे वाक्य आपण म्हणतो. त्यात ‘मराठा’ हा शब्द ‘जात वाचक’ आहे की ‘समूहवाचक’ हे आपण तपासले पाहिजे. मराठा व्यवस्था ओरडून सांगत आहे की, गरीब मराठ्यांची आज परिस्थिती भयानक आहे. याचा अर्थ मराठा हा कुठल्यातरी कॅटेगिरीत बसतो, मात्र ते सांगितले व दाखवले जात नाही. कारण ते कॕटेगिरीत समाविष्ट नाहीत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यात मराठा एक नंबर ला आहे. समूहवाचक क्षत्रिय असणारा मराठा हा समाज वाचक उपेक्षित राहिला. हमाली, कामगार, बेरोजगारी, डबेवाले पासून ते श्रीमंत 68 घराण्यांच्या सावलीत राहिला. मोठा भाऊ म्हणून सतत पोटाला चिमटे घेत जिवंत राहिला. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे कुणबी हा बांधावरच राहिला. परवाचा कुणबी, काल मराठा झाला. आज पर्यंत शूद्र होता, मात्र तो गावकुसात अडकून आजही गरीब होता व राहिला. मात्र बडे नेते (साहेबांच्या) आशीर्वादाने तो आर्थिक दृष्ट्या मागास राहिला. असे विचार संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

बरे झाले देवा कुणबी केलो नसता दंबे असतो मेलो…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज

संतोष शिंदे पुढे बोलताना की, ‘शेती’ करणारा प्रत्येक व्यक्ती हा ‘कुणबी’ होता. कालांतराने कागदावर जात आली आणि प्रत्येकाने स्वतःच्या क्रमानुसार जातीचा समूहवाचक उल्लेख कागदावर घेतला ज्या समाजाला आरक्षणाची जाण होती त्यांनी ती नोंदवली मात्र कडक कपड्यात वावरण्याचा नादामध्ये स्वतःच्या हुशारकीसाठी आरक्षणाच्या चौकटीमध्ये अडकले नाहीत. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन मराठा-कुणबी व कुणबी-मराठा एकच आहेत. त्यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी संबोधून ओबीसी’मध्ये समाविष्ट होण्यासाठी आवाहन केलं, मात्र ज्यांनी ऐकलं ते आज घटनात्मकदृष्ट्या कुणबी म्हणजेच ओबीसी झाले आणि ज्यांनी ऐकलं नाही ते आज लाखोंचे मोर्चे काढा काढून ओबीसी’मध्ये समाविष्ट करा म्हणून आंदोलन करत आहेत. परवाचा दहा एकर जमीन असणारा आज लाखो रुपये गुंठ्यांनी शेतजमीन विकत आहे. तोच व्यक्ती उद्या भूमिहीन – अल्पभूधारक होणार आणि त्याच विकलेल्या जमिनीवर वॉचमेन म्हणून आयुष्य काढणार यात शंका नाही. मग त्याची पिढची पुढी जगणार कशी…?

या देशात आरक्षणाच्या फक्त तीन कॅटेगिरी आहेत ते सर्व 52 टक्के च्या आरक्षणामध्ये समाविष्ट होतात. एससी, एसटी, ओबीसी या सगळ्यांची जातनिहाय टक्केवारी काढल्यानंतर 52 टक्के च्या आत जो घटक राहतो त्यात तो सर्वसाधारण अर्थात सवर्ण म्हणून गणला जातो. मागासवर्ग आयोगाच्या वतीने न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार जी काही राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाची शिफारस केलेली आहे तीच तत्वतः समाजाची परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघा’सह इतर सगळ्या संघटनाची मराठा आरक्षणाबाबत ची एकच मागणी आहे की, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे एकच आहेत. सरसकट मराठा समाजाला कुणबी संबोधून मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा तरच मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळू शकते. मात्र समावेश करताना ओबीसी (OBC) च्या मूळ आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे. ही राज्य सरकार, केंद्र सरकार व नेत्यांची मोठी जबाबदारी आहे. मात्र भाकरी फिरवण्याच्या नादात, कधी तवा करपला आणि कधी भाकरी करपली त्यामुळे कुणालाही खायला मिळालेली नाही हे वास्तव आहे.

आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. गरीबी हटाव कार्यक्रम नाही. EWS हा मराठ्यांसाठी तात्पुरता पर्याय आहे, कायमस्वरूपी उपाययोजना नाही. त्यामुळे आपल्या मागणी घटनात्मक आरक्षण आणि समाजाची उन्नतीसाठी संविधानाच्या चौकटीमध्ये बसते. याशिवाय दुसरा पर्याय नाही.

केंद्र सरकारने आरक्षणाच्या मर्यादा ही 52% यावरून 75% टक्के किंवा जास्त वाढवली पाहिजे व मराठा समाजासह जो समाज आरक्षण मागतो त्यांच्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून व सब कॅटेगिरी करून घटनात्मक आरक्षण देणे गरजेचे आहे. कारण दररोज आरक्षणासाठी तरुण किंवा इतर लोक आत्महत्या करत असतील आणि माणसं जिवंत राहणार नसतील तर नंतर आरक्षणाचा उपयोग कुणासाठी हा मुख्य प्रश्न आहे.

जन्माने कोणी कुठल्या जातीमध्ये प्रवेश करावा हे कुणाच्याही हातात नसताना आणि भारतीय संविधान सर्वांसाठी असताना आपण कुणालाही कुठल्या जातीतल्या आरक्षणाला विरोध करू शकत नाही, ही नीच वैचारिकता मानसिकता आपण संपवली (बदलली) पाहिजे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारने सुद्धा आरक्षणाचा प्रश्न वेळीच संपवला पाहिजे अन्यथा… ‘नवीन व्यवस्था परिवर्तना’ शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

‘मराठे शूद्र’च… हे पटवून सांगणारे साहेबांचा फोन आल्यानंतर अचानक ‘सवर्ण’ होतात आणि लाखो समाज बांधवांना अचानक उन्हामध्ये उभं करतात ही वैचारिक मानसिकता धोकादायक आहे. (सध्यातरी आरक्षणाची भूमिका सरकार विरोधी असल्यामुळे साहेबांचा फोनमध्ये फार जादू आहे.) नमागता मिळालेले १०% EWS चे आरक्षण हे सवर्णांसाठी आहे. त्याचा लाभ मराठा समाजाने तात्पुरत्या स्वरूपासाठी घ्यावा. कारण निम्म्या लोकांच्या जुन्या कागदपत्रातील नोंदी या कुणबी असतील आणि आज तुम्हालाजर दाखले मिळत नसतील तर हा तुमच्या पुढारलेल्या नेत्यांच्या करंटेपणामुळे तुम्ही आज OBC आरक्षणापासून उपेक्षित आहात, आणि हा तुमचा घटनात्मक अधिकार आहे. कारण ४०० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणाले, महात्मा फुले स्वतःला कुणबी म्हणाले… मग मराठा-कुणबी म्हणाला तर पोटात गोळा यायचं कारण काय…?

श्रीमंत 68 घराणी सोडली तर सर्वसामान्य गरीब मराठा हा गरीबच आहे. मुळात मराठे हे शूद्र असताना अचानक मराठे आर्थिक सुवर्ण कसे झाले… हा नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने आरक्षण चळवळीचा खून आहे. कारण मराठ्यांना ओबीसी (OBC) मध्ये आरक्षण द्यायचं आहे तर ‘धनगर’ समाजाला एसटी (ST) मध्ये आरक्षणाची फक्त ‘आमलबजावणी’ करायची आहे. जे घटनात्मक दृष्ट्या वैद्य आहे. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आरक्षणाचा खेळखंडोबा झाला.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ह्या दोन खुर्च्या जोपर्यंत गदागदा हलवणार नाही आणि आमच्यातील निवडून दिलेले (गप्पीमासे) लोकप्रतिनिधींना (आमदार-खासदार) अडवून बोलणार नाहीत… तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही… हे निर्विवाद सत्य आहे. बाकी आरक्षणाचा खेळ नको.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »